प्रा.सुरेश नारायणे
तालुका प्रतिनिधी, नांदगाव
नांदगाव. 18 – मनमाड शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले सावित्रीबाई फुले मार्केट व्यपारांसाठी सर्व सोयी युक्त उपलब्ध करण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले) पक्षाचे उत्तर महाराष्ट्राचे युवक आघाडी चे मा.वंदेशजी गांगुर्डे यांनी मनमाड नगर पालिकेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.या प्रसंगी आर.पी.आय व्यापारी आघाडीचे शहराध्यक्ष संजय मुनोत, व्यापारी तालुकाध्यक्ष अनिलजी गुंदेचा, युवा नेते बाळासाहेब वाघ, आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.


