सय्यद रहीम रजा
तालुका प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड – (दि. 18 ऑगस्ट ) मागील जवळपास दोन ते तीन महिन्यांपासून माणिपूर या राज्यात हिंसा सुरु असून ती थांबवावी व तेथील महिलांवर होणाऱ्या अत्याचारच्या निषेधार्थ आदिवासी भव्य मोर्चा काढुन निषेध व्यक्त केला.माणिपूर येथील हिंसेदरम्यान एक विडिओ वायरल झाला असून यामध्ये काही लोक दोन स्त्रियांची नग्न अवस्थेत थिंड काढत होते.ही घटना संताप जनक असून या घटनेचा निषेध करण्यासाठी आला असून केंद्र सरकार ला माणिपूर हिंसा थांबविण्यासाठी व महिलांवरील वाढते अत्याचार थांबविण्याचे आवाहन केले आहे.हा प्रकार अत्यंत घृणास्पद असून महिलांच्या इज्जतीचे धंदे उडवणारे आहे.आजच्या देशाच्या राष्ट्रपती एक आदिवासी महिला असून आदिवासी महिलांना नग्न करून त्यांचे धिंड काढले गेले त्यांच्या अमानुषपने सार्वजनिक बलात्कार करण्यात आले.या घटनेच्या सर्व स्तरावर स्वरूपात निंदा होत आहे. याच तीव्र घटनेचा निषेध करत आदिवासी भव्य मोर्चा उमरखेड येथे काढण्यात आला.हा मोर्चा कृषी उत्पन्न समिती बाजार येथून बिरस मुंडा यांच्या चौक मधून महेश्वरी चौक, छ शिवाजी महाराज चौक, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या आदिवासी कृती समिती चे प्रकाश शिकारे सर यांनी पुष्पहार अर्पण करून जन मोर्चा महागाव रोड वरून हा थेट उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे पोहोचला.आणि तहसील कार्यालयाच्या प्रणांगणात मणिपूर येथील घटनेच्या निषेधार्थ विविध सामाजिक संघटना, लोकनेते यांनी त्या मणिपूरच्या घटनेसंबंधी आपापले मते व्यक्त केली.तसेच या भव्य दिव्य आदिवासी मोर्चाला ठाकरे गटाचे पदाधिकारी तसेच काँग्रेसचे कार्यकर्ते, वंचित बहुजन आघाडीचे व भीम टायगर सेनेचे कार्यकर्ते तसेच काही सामाजिक संघटना ह्या ने पाठिंबा दिला.यावेळी हा भव्य दिव्य आदिवासी मोर्चा चे आयोजन आदिवासी कृषी समिती उमरखेड तालुका तसेच बिरसा मुंडा सार्वजनिक जयंती उत्सव समिती उमरखेड यांच्याकडून आयोजित करण्यात आला होता.हा मोर्चा तहसील प्राणांगणात संपूर्ण च्या जमावाने उपस्थित होता तसेच आदिवासी महिला भगिनींनी निवेदन एसडीओ कार्यालयातील प्रतिनिधींना देण्यात आले व आमच्या या निवेदनाची थेट दखल राष्ट्रपती पर्यंत पोहचावी निवेदनातून पाठवा.आदिवासी कृती समिती चे प्रकाश शिकारे,उपाध्यक्ष फकीरराव धनवे कार्याध्यक्ष शेषराव इंगळे सचिव रंभाजी कबले सहसचिव अनिल ठाकरे व इतर सर्व सदस्य व बिरसा मुंडा सार्वजनिक जयंती उत्सव चे अध्यक्ष, विठ्ठल पोटे, उपाध्यक्ष अशोक हजारे, सचिव सुदाम शिरडे, कोषाध्यक्ष दत्ताभाऊ मिराशे, सदस्य बाबुराव किरवले, अरुण बुरकुले, कैलास गारोळे, विठ्ठलराव खुपसे, विजय चवरे, देविदास खोकले, संजय अंभोरे, माधव माहुरे, निरंजन वाळके, प्रशांत देवकर, संतोष पिंपळे, कोंडबा झाटे, देविदास मुकाडे , योगीराज फोपसे, कल्याण बोंबले, चंद्रकांत खंदारे, बापूराव चिरंगे, कांतराव मोरे, दत्तराव उगले, सुखदेव शेळके, प्रल्हाद फोले, रामेश्वर मोरे, सुभाष भरकाडे, गोपाल वायकुळे
उपस्थित सर्वच महिलांनी निवेदन दिले.यावेळीसामजिक कार्यकर्ते मोहन मोरे, सामाजिक कार्यकर्ते साहेबराव कांबळे, नंदुभाऊ आग्रवाल, बाळासाहेब चंद्रे, संतोष जोगदंडे तालुकाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी उमरखेड, जिजाऊ बिग्रेडच्या अध्यक्ष सरोजताई देशमुख, प्रतिभा कांबळे सामाजिक कार्यकर्त्या इत्यादींनी आपले प्रखर मनोगत व्यक्त केले.यावेळी के.के कदम, शिवसेना तालुका प्रमुख सतिष नाईक, गजेंद्र ठाकरे, खामनेकर, राजु गायकवाड, जॉन्टी विनकरे, देवानंद पाईकराव,पत्रकार सिध्दार्थ दिवेकर याच बरोबर ठाकरे गटाचे व काँग्रेसचे पदाधिकारी तसेच तालुक्यातील पत्रकार मंडळी या भव्य मोर्चाला हजारोच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.


