अनंत कराड
पाथर्डी तालुका प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील शिरसाठ वाडी येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रावण मासानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह सुरुवात झाली असून ज्ञानेश्वरी पारायण गाथा भजन हरिपाठ व रात्री नामवंत महाराज मंडळी यांच्या कीर्तनाचे आयोजन केले आहे. या सप्ताह मध्ये तालुक्यामधून भाविक भक्त कीर्तनाचे श्रवण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात हजेरी लावत आहेत. सप्ताह चे नियोजन समस्त ग्रामस्थ मंडळी शिरसाट वाडीकर करत आहेत.