रितेश टीलावत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
तालुका कृषी अधिकारी अकोट व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अकोट यांचे अंतर्गत कृषी सहकार व शेतकरी कल्याण विभाग नवी दिल्ली व आत्मनिर्भर भारत अभियान अंतर्गत कृषी पायाभूत सुविधा निधी (AIF) योजना व प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांचे उन्नयन योजना (PMFME) अंतर्गत एकदिवसीय कार्यशाळा बचत भवन, पंचायत समिती, अकोट येथे शुक्रवार दिनांक 18 ऑगस्ट 2023 रोजी संपन्न झाली.कार्यशाळेत डॉ.मुरली इंगळे प्रकल्प संचालक आत्मा अकोला, सुशांत शिंदे तालुका कृषी अधिकारी अकोट यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून राहुल ठाकरे, पुरवठा व मूल्यसाखळी तज्ञ विभागीय अंमल बजावणी कक्ष स्मार्ट प्रकल्प अमरावती हे होते. प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य योजना पी एम एफ एम ई कृषी पायाभूत सुविधा ए आय एफ या योजनेचा लाभ उपस्थित सर्व, शेतकरी, शेतकरी कंपन्या, शेतकरी गटांचे सदस्य, सहकारी संस्था, बहु उद्देशीय संस्था या सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन डॉ.मुरली इंगळे, प्रकल्प संचालक यांनी आपल्या प्रास्ताविकात मार्गदर्शन करतांना केले. राहुल ठाकरे यांनी योजनेचे निकष, योजनेकरीता पत्र असलेले सर्व घटक याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करत असताना योजने करीता आवश्यक असलेल्या कागदपत्रांची माहिती देत अर्ज भरण्याचे प्रात्यक्षिक करूनदाखवले. कार्यशाळेला जिल्हा अग्रणी बँकेचे सहाय्यक व्यवस्थापक नितीन घोरे यांचे सह तालुक्यातील सर्व बँकेचे शाखा व्यवस्थापक, बि.टी.एम., ए.टी.एम., मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक, पी एम फ एम ई योजने अंतर्गत कार्य रत जिल्हा संसाधनव्यक्ती, आदींची उपस्थिती होती तसेच शेतकरी कंपन्यांचे सदस्य, शेतकरी गट, सहकारी संस्था, उमेद व माविम अंतर्गत गटांचे सीआरपी,गटांचे अध्यक्ष व सदस्य यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.कार्यशाळेचे सूत्रसंचालन व आभार अनंत देशमुख, कृषी पर्यवेक्षक यांनी केले.











