मोहन चव्हाण
तालुका प्रतिनिधी परळी वैजनाथ
परळी दि: 27/10/2023 येथील उपजिल्हा रुग्णालय परळी वैजनाथ येथे वैद्यकीय अधिकारी पदाचा डॉ. तुकाराम वैजनाथ गुट्टे यांनी पदभार स्वीकारला आहे. यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरुण गुट्टे उपस्थित होते. नाथ शिक्षण संस्थेच्या वतीने शाल, पुष्पगुच्छ, फेटाबांधून स्वागत करून येथोचित सत्कार करण्यात आला. परळी तालुक्यातील दैठणा गावचे रहिवासी कर्तव्यदक्ष वैद्यकीय अधिकारी डॉ.तुकाराम वैजनाथ गुट्टे हे गडचिरोली येथील सिरोंचा ग्रामीण रुग्णालय येथे वैद्यकीय अधिकारी या पदावर सेवा बजावली आहे. आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट सेवा दिली. दुर्गम आणि नक्षलग्रस्त क्षेत्र आणि महाराष्ट्राचे अंतिम टोक असलेल्या ग्रामीण रुग्णालय सिरोंचा येथे 03 वर्षे स्वेच्छेने सेवा दिली. त्यांच्याकडे आता परळी उपजिल्हा रुग्णालय येथे वैद्यकीय अधिकारी पदाची जबाबदारी सोपवली आहे. व डॉ. तुकाराम गुट्टे यांनी वैद्यकीय अधिकारी पदाचा पदभार स्वीकारला आहे. नवीन वैद्यकीय अधिकारी यांचा नाथ शिक्षण संस्था व मित्र मंडळच्या वतीने सत्कार करून स्वागत केले आहे.


