संजय भोसले
तालुका प्रतिनिधी , कणकवली.
कणकवली तालुक्यातील तळेरे येथील बाजारपेठ मित्र मंडळाच्या नवरात्र उत्सवाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध मान्यवरांनी यादरम्यान भेटी देऊन मंडळाच्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने बाजारपेठ मित्रमंडळाच्या बोधचिन्हाचे यावेळी मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.या मंडळाचे यावर्षी 12 वे वर्ष होते. यावर्षीही रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात प्रत्येक दिवशी रासगरबा, विविध बक्षिसे देण्यात आली. शेवटच्या दिवशी विविध स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांना गौरविण्यात आले. यादरम्यान भंडारा उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदावर पदोन्नती मिळालेले कासार्डे गावचे सुपुत्र जयप्रकाश परब, सुशांत नाईक, माजी सभापती दिलीप तळेकर यांच्यासह विविध मंडळाचे पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन मंडळाच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी मंडळाच्या वतीने उपस्थित पाहुण्यांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी घेण्यात आलेल्या वेशभूषा स्पर्धेतील 90 पेक्षा जास्त स्पर्धकांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. तर या मंडळाच्या बोधचिन्हाचे अनावरण व्यावसायिक मनोज महाडिक आणि सचिन पावसकर यांच्या हस्ते करण्यात आले.