अशोक कराड
ग्रामीण प्रतिनिधी करंजी
करंजी. पाथर्डी तालुक्यातील अकोले या गावात बबनराव ढाकणे यांचा जन्म झाला छोट्याशा खेड्यामध्ये जन्मलेले बबनराव ढाकणे गल्लीपासून दिल्लीपर्यंत राजकारणात एकमेव नेता बनला आहे. देशाचे पंतप्रधान इंदिरा गांधी देशाचे पंतप्रधान इंदिरा गांधी यांना आपल्या गावी बोलू सत्कार करण्यात आला. छोटीशी मूर्ती, महान कीर्ती नासा नेता म्हणजे बबनराव ढाकणे या नेत्याने अखेरचा निरोप घेतला
बबनराव ढाकणेयांनी विद्यार्थी दशेतच थेट दिल्लीला जाऊन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची १९५१ मध्ये भेट घेतली होती. हे त्यांच्या आयुष्यातील पहिले आंदोलन ठरले. गोवामुक्ती सत्याग्रहात त्यांनी भाग घेतला. तसेच पाथर्डी तालुक्यातील विकासाबाबत विधानसभेत जाऊन पत्रके भिरकावली होती. बाजार समितीपासून त्यांनी आपले राजकारण सुरू केले. पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा आणि लोकसभा असा त्यांचा यशाचा टप्पा राहिला. महाराष्ट्रात सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री, ग्राम विकास खात्याचे कॅबिनेट मंत्री, जनता पक्षाचे अध्यक्ष अशा जबाबदा-या त्यांनी पार पाडल्या. तत्कालीन पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या सरकारमध्ये ते ऊर्जा राज्यमंत्री होते. दिवंगत ढाकणे यांचा पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, व्ही. पी. सिंग अशा मोठ्या नेत्यांचा सहवास त्यांना लाभला होता. माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांचा पुतळाही त्यांनी पाथर्डीत उभा केला. दिवंगत ढाकणे यांच्या मागे मुलगा प्रतापराव ढाकणे, सून, नातवंडे असा परिवार आहे. शनिवारी दुपारी दोन वाजता पागोरी पिंपळगाव (तालुका पाथर्डी) येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.