भारत भालेराव
तालुका प्रतिनिधी शेवगाव
शेवगाव : शाळा हे संस्काराचे केंद्र आहे.या विद्यालयात संस्कारशील शिक्षण दिले जाते.शाळेबरोबरच पालकांनीही आपल्या मुलांवर उत्तम संस्कार करावेत. पालकांनी व शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करावा असे प्रतिपादन आबासाहेब काकडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य संपतराव दसपुते यांनी केले.गुरुवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी विद्यालयात आयोजित विद्यार्थी,पालक,शिक्षक मेळावा प्रसंगी व्यासपीठावरून बोलत होते.पुढे बोलताना प्राचार्य दसपुते म्हणाले की पालकांनी मुलांच्या वर्तनाकडे लक्ष द्यावे. विद्यार्थ्यांचा विकास करायचा असेल तर विद्यार्थी पालक शिक्षक समन्वय अत्यंत महत्त्वाचा आहे असे ते म्हणाले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वडूलेचे सरपंच प्रदीप काळे होते.यावेळी व्यासपीठावर उपमुख्याध्यापिका सौ.मंदाकिनी भालसिंग,पर्यवेक्षिका श्रीम.पुष्पलता गरुड,राजेश दारकुंडे,किसनराव जाधव व्यासपीठावर उपस्थित होते.यावेळी बोलताना सरपंच प्रदीप काळे म्हणाले की विद्यार्थ्यांनी मोबाईल,टी.व्ही.यांचा वापर राजहंसा सारखा करावा.तसेच मुलींच्या प्रगतीचा उंचावलेल्या आलेखाचा उल्लेखही त्यांनी आवर्जून केला.माध्यमिक शिक्षण हे उच्च शिक्षणाचा पाया आहे असेही ते म्हणाले.यावेळी व्यासपीठावर पालक प्रतिनिधी श्रीम.आव्हाड गितांजली,अशोक काळे,संजय गंगावणे,बडे संजय,श्रीम.आघवणे कल्पना, श्रीम.आल्हाट अंजना यांनी विद्यालयाविषयी आपले विचार व्यक्त केले.विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक किसनराव जाधव यांनी विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या पर्यवेक्षिका श्रीम पुष्पलता गरुड यांनी केले. यावेळी विद्यालयात राबवत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी पालकांना दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर शेळके यांनी केले तर आभार अविनाश भागवत यांनी मानले.कार्यक्रमासाठी बहुसंख्य पालक उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले


