जलील शेख
तालुका प्रतिनिधी पाथरी
ढालेगाव ता.पाथरी येथील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मा.आ.बाबाजानी दुर्राणी यांच्या नेतृत्वात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. यामध्ये वंचित बहुजन आघाडीसह इतर पक्षातील नितीन विष्णू भदर्गे, नारायण सटवाजी भदर्गे, अविनाश कुंडलिक जाधव, नाथा दामोदर पाईकराव, अविनाश नामदेव पाईकराव, महेंद्र महादेव भदर्गे, नंदू यमाजी भदर्गे, नारायण ज्ञानोबा शिंदे, परमेश्वर कारभारी घाटूळ, मिलींद अप्पाराव जावळे इत्यादी शेकडो कार्यकर्त्यांचा समावेश आहे.