संतोष पोटपिल्लेवार
तालुका प्रतिनिधी, घाटंजी
घाटंजी:- राज्य शासनाने ”मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना सुरू केली आहे.या योजनेतून प्रत्येक महिलेच्या खात्यात दीड हजार, तिन हजार,साडेचार हजार रुपये जमा केले जात आहे. मात्र बॅकेच्या अलगर्जीपणामुळे अजूनही अनेक महिलांना याचा लाभ मिळाला नाही.मुख्यमंत्री साहेब बॅकेच्या अडेलतट्टू पणामुळे आम्ही तुमच्या लाडक्या नव्हे तर सावत्र बहिणी झाल्या असल्याची टीका या महिलांकडून केली जात आहे.राज्य शासनाने दोन महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी योजना सुरू केली.या योजनेतून दरमहा महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये जमा केली जातील, अशी घोषणाही केली. त्यानुसार रक्षाबंधणादरम्यान जिल्ह्यातील काही महिलांच्या खात्यात दोन महिन्यांचे तीन हजार रुपये जमा झाले. नंतर साडेचार हजार आले काहींना दिड हजार आले आहे.तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचा महिला सक्षमीकरणाचा कार्यक्रमही याच कालावधीत पार पडला होता. त्यावेळी काही महिला लाभार्थ्यांना प्रत्यक्ष या योजनेचा लाभही देण्यात आला.परंतु,अजूनही अनेक महिलांना या योजनेतून पैसे मिळालेले नाही. त्यांनी विविध सायबर कॅफेवर जावून तपासणी केली. मात्र पैसे कोणत्या बँक खात्यात जमा झाले, हे कळायला
आधारकार्ड लिंक असलेल्या खात्यातच पैसे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अनुदान आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यातच जमा करण्यात आले आहे. अनेक महिलांचे लग्नापूर्वीचे बँक खाते माहेरी काढलेले आहे. याच खात्यात सदर योजनेची रक्कम जमा करण्यात आली. त्यामुळे महिलांना पैसे काढण्यासाठी माहेरची वारी करावी लागत आहे.तर काही महिलांना बॅकेत हेलपाटे मारावे लागत आहे. सर्व्हर डाउनमुळे अनेक महिलांचे पैसे जमा झाले की नाही हे देखील स्पष्ट झाले नाही. त्यामुळे महिलांची प्रतीक्षा कायम आहे.अन्य महिलांच्या खात्यात पैसे आले पण आपल्या खात्यात पैसे जमा झाले नसल्याने नाराजीचा सूर आहे. तसेच आम्ही लाडक्या नाही तर सावत्र बहिणी आहे, त्यामुळेच आमच्या खात्यात सरकारने पैसे जमा केले
नसल्याची ओरड महिला करीत आहे. एकूणच या सर्व प्रकारामुळे दुजाभाव झाल्याचे बोलल्या जात असून शासनाने प्रतिक्षेतील महिलेच्या खात्यात पैसे जमा करावे,अशी मागणी होत आहे.











