गजानन डाबेराव
ग्रामीण प्रतिनिधी नांदुरा
नांदुरा :- तालुक्यातील शेंबा बु येथे दि.२९ सप्टेंबर रोजी कृषी विद्यालयाच्या प्रांगणात रक्तदान श्रेष्ठदान या संकल्पनेतून जयसिंग राणा फाऊंडेशनच्या वतीने थलेसिमिया ग्रस्त बालकांना वेळीच रक्ताच्या गरजेची पूर्तता व्हावी यासाठी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, तरी परिसरातील युवक युवतींनी या रक्तदान शिबिरात आपला सहभाग नोंदवून या राष्ट्रीय कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवावा.असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.अरे हे आता सर्व विसरावे संतांनी सांगितले तेची करावे!मानवाने मानवाशी सहाय्य करावे याहुनी महा पुण्य कोणते!”या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ओव्या आज प्रत्यक्षात अमलात आणण्याची वेळ आली आहे.तालुक्यात व परिसरात थलेसिमिया ग्रस्त बालकांची संख्या वाढत चालली आहे,त्यांना रक्ताची नितांत गरज भासत असून त्याची ती गरज पूर्ण व्हावी यासाठी युवकांनी पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे.त्यासाठी हे रक्तदान शिबिर ग्रामीण भागात होत असून जास्तीत जास्त युवक,युवतींनी या राष्ट्रीय कार्यात हातभार लावावा अशी आर्त हाक या माध्यमातून देण्यात आली आहे.नांदुरा तालुक्यातील शेंबा बु येथे सकाळी ९ वाजता कृषी विद्यालयाच्या प्रांगणात शहीद भगतसिंग यांच्या जयंतीचे औचित्य साधून हे महारक्तदान शिबिर होत आहे.तरी जास्तीत जास्त संख्येने या शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन जयसिंग राणा फाउंडेशन ने एका प्रसिद्धीपत्रकात केले आहे.


