सय्यद मुहाफिज
शहर प्रतिनिधी अहमदनगर
अहमदनगर : अहमदनगरचे ग्रामदैवत असणारे विशाल गणेश मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी जाताना असभ्य कपडे घालण्यास बंदी करण्यात आली आहे.
असभ्य आणि अशोभनीय वस्र धारण करून येणाऱ्यानां मंदिरात प्रवेश नाही, असे फलक मंदिरात आजपासून मंदिरात लवण्यात आले आहे.मंदिरात येणाऱ्या सर्व भक्तांना मंदिराच्या संस्थेचे ठळक आवाहन करण्यात आले आहे.गेल्या काही दिवसांपासून महिलांच्या असभ्य वस्त्र धारण करण्याचे प्रकरण समोर येत होते.आणि त्यामुळे दर्शनाला येणाऱ्या भक्तानां एक प्रकारे त्रास होत होता.ते आज मंदिर समिती कडून थांबविण्यात आले आहे.त्यामुळे संस्कृती आणि भक्तीचे दर्शन होणार असल्याने या निर्णयाचे स्वागत होत असल्याचे दिसत आहे.