अजिज खान
शहर प्रतिनिधी ढाणकी
तालुक्यातील बंदी भागात येत असलेल्या जेवली गावात जिल्हा परिषद व पंचायत समिती कृषी विभागाने संयुक्त कारवाई करत 298 अवैध बोगस खताचा साठा जप्त केला खरीप हंगामाच्या तोंडावर अवैध बोगस खताचा साठा जप्त झाल्याने खळबळ उडाली आहे.उमरखेड तालुक्यातील जेवली गावात बोगस खत विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यावर कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ आर व्ही माळोदे, पंचायत समिती कृषी अधिकारी अतुल कुमार कदम तसेच जिल्हा गुणवत्ता नियंत्रण के एस पाटील यांनी सदर खताच्या गोडाऊनवर धाड टाकली त्यावेळी त्या ठिकाणी नागपुर येथील कंपनीचा अँग्री फोर्स रत्ना या नावाचे 298 डीएपी खताच्या बॅगा आढळून आल्या. खत विक्रेता कोणताही परवाना नसताना त्याच्याकडून खत विक्री केल्या जात होते . यावेळी अधिकाऱ्यांना त्यांच्याकडे कोणताही परवाना आढळून आला नाही त्यामुळे सदर खताचे पोते जप्त करून बिटरगाव पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले होते .ज्या दुकानातून खत जप्त केले ते दुकान संतोष दळवी यांचे असून त्यांनी ते संकेत इंगोले बिटरगाव यांना भाड्याने दिले होते त्या ठिकाणी अवैध खताचा साठा करून शेतकऱ्यांना खत विक्री केल्या जात होते . बातमी लिहिस्तोवर बिटरगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्याचे काम चालू होते.