अशोक गायकवाड
ग्रामीण प्रतिनिधी ढाणकी
ढाणकी : शहरात सद्यस्थितीत मटका व जुगार खुलेआम सुरू असल्याचा चर्चेला उधाण आले आहे. सदर मटका व जुगार स्थानिक पोलीस प्रशासनाच्या कृपेने जोरात सुरू असल्याची चर्चा नागरिक करताना दिसत आहेत.वृत्तपत्रात बातम्या आल्या की सदर अवैध मटका चालवणाऱ्या काही लोकांना, पोलीस प्रशासन पकडते व थातूरमातूर कारवाई करून सोडून देते. अशी जनता म्हणताना दिसत आहे.जर एखाद्या पत्रकाराने ढाणकी शहरात सुरू असलेल्या अवैध धंद्या बाबतीत बातमी टाकली तर, त्या पत्रकारावर स्थानिक पोलीस मुद्दामून कोणत्यातरी प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न करीत असल्याची चर्चा पत्रकार करताना दिसत आहेत. म्हणजे पोलीस प्रशासनाच्या दादागिरीमुळे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न, स्थानिक पोलीस प्रशासन कोणाच्या बळावर करीत असेल? हा प्रश्न निर्माण होतो. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ढानकीकडे गांभीर्याने लक्ष देऊन, ढाणकीत सुरू असलेले अवैध मटके यावर चाप निर्माण करण्याकरता, काहीतरी कार्यवाही करावी. तसेच ढाणकी शहरात, शहराच्या बाहेर , शेती शिवारात दिवसाढवळ्या आणि रात्री सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रोफेशनल जुगार सुरू असल्याची चर्चा आहे ? हा जुगार जर पकडला गेला तर ढाणकी शहरातील, आजूबाजूच्या परिसरातील प्रतिष्ठित नागरिक यामध्ये सापडण्याची दाट शक्यता आहे? या अवैध धंदेवाल्यांकडून स्थानिक पोलिसांना हप्ते सुरू असल्याची सुद्धा चर्चा आहे. आता वरिष्ठ अधिकारी यावर काय कारवाई करणार ? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.











