मनोज गवई
तालुका प्रतिनिधी चांदुर रेल्वे
चांदुर रेल्वे:सोयाबीनला ८ हजार रूपये प्रतिक्विटल भाव मिळण्यात यावा, येलो मोझॅकमुळे सोयाबीनच्या होत असलेल्या नुकसानीचे पंचनामे करावे व त्याला पिक विमा लागू करा अशा मागणाचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने अमरावती येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना प्रत्यक्ष भेटून देण्यात आलाअमरावती जिल्ह्यात गेल्या आठ महिन्यांमध्ये २०१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्या २०१ आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांमध्ये ३८ तरुण शेतकरी आहे. ही आत्महत्या शेतकऱ्यांची सतत नापिकी, शेतकऱ्यांच्या पिकाला भाव नसल्यामुळे ह्या आत्महत्या झालेल्या आहे. केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना हमीभाव योजना लागू केली तर शेतकरी आत्महत्या करण्याचे प्रमाण बंद होईल.परंतु सरकार शेतकऱ्यांच्या हिताकरिता कोणतेही निर्णय घेत नाही,परिस्थितीत सोयाबीनचे भाव केवळ ४२०० पर्यंत मिळत आहे.त्यामध्येही शेतकऱयांच्या सोयाबीनवर येलो मोझॅक नावाचं संकट शेतकऱयांच्या सोयाबीन पिकावर आलेला आहे.कधी अधिक पाऊस तर अचानक कडक उन्हामुळे सोयाबीन उत्पादनात घट झाली शेतात लागवडी खर्च जास्त लागला अश्यात भाव कमी असल्याने शेतकऱ्यांच्या सोयाबीनला ८ हजार रूपये प्रतिक्विटल भाव मिळण्यात यावा, तसेच येलो मोझॅकमुळे झालेल्या सोयाबीनच्या नुकसानीला पिक विमा लागू करण्यात यावा व या नुकसानीचे पंचनामे करण्यात यावे अशी मागणी पालकमंत्री चंद्रकात पाटील यांच्याकडे निवेदनाव्दारे करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे चांदूर रेल्वे तालुकाध्यक्ष प्रशांत शिरभाते,शहराध्यक्ष दिनेश आमले,कार्यकर्ता कपील पडघन आदींची उपस्थिती होती.

