नंदकुमार कावळे
तालुका प्रतिनिधी महागाव
आज दिनांक 21 ऑक्टोबर 2023 रोजी भारतीय जनता पार्टी महागावच्या वतीने तत्कलिन काँग्रेस राष्ट्रवादी युती तसेच महाविकास आघाडी सरकारच्या दरम्यान देण्यात आलेल्या कंत्राटी नोकर भरतीच्या निर्णया विरोधात आंदोलन करण्यात आले.गेल्या वीस वर्षापासून महाराष्ट्र राज्यात कंत्राटी नोकर भरती सुरू होती.ज्याची सुरवात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने केली होती.परंतु काल दिनांक 20 ऑक्टोबर 2023 रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याद्वारे कंत्राटी नोकर भरतीचे सर्व जीआर रद्द करण्यात आली आहे.याप्रसंगी माजी आमदार राजेंद्र नजरधने,जिल्हा सचिव विलासराव शेबे,तालुका सरचिटणीस योगेश वाजपेयी,माजी नगर उपाध्यक्ष सुरेश नरवाडे,शहराध्यक्ष निलेश नरवाडे,विशाल डहाळे,समाधान पाटील ठाकरे,कैलास वानखेडे,राहुल आडे,अमर दळवी,रघुनाथ नरवाडे,विजय पाटील,संजय चिंतामणी,रविराज कावळे व इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.