अरविंद बेंडगा
तालुका प्रतिनिधी, तलासरी
पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग आणि मजूर वर्ग राहतो, त्यांना त्यांच्या घरी उजेडासाठी लाईट लागत असल्याकारणामुळे महावितरण कंपनीकडून दिलेला लाईटचा मीटर बसवण्यात आलेले आहेत, घरात एक दोन बल्ब आणि एखादा पंखा असतो तरीसुद्धा दर महिन्याला महावितरण कडून रिडिंग न घेता लाईट बिल तयार करतात आणि आमच्याकडून दर महिन्याला मोठ्या प्रमाणात लाईट बिल आकारले जाते असा आरोप पालघर जिल्ह्यातील स्थानिक शेतकरी वर्ग आणि मजूर वर्गाकडून करण्यात येत आहे,मीटर मध्ये कमी रिडींग असते आणि लाईट बिलावर जास्त रिडींग छापली जाते.एक महीन्याला 350 रुपये,तर दुसऱ्या महिन्याला 3500 रुपये असा ही बिल येत असतो, काही तालुक्यांमध्ये महावितरण कडून मीटरचे रीडिंग न घेता अंदाजे लाईट बिलावरती रीडिंग देऊन मोठ्या प्रमाणात लाईट बिल चे पैसे घेऊन लुटण्यात आले होते असा ही काही घटना काही दरम्याच्या काही मागच्या महिन्यात उघडकीस आल्या होत्या, नागरिकांचा आरोप आहे की लाईट तर आम्ही दर महिन्याला तेवढीच वापरतो तरीसुद्धा आम्हाला दर महिन्याला लाईट बिलाच्या रकमेमध्ये एवढी उलाढाल कशी काय दिली जाते, काहीजण खांब वरती आकडे टाकून ( लाईटची चोरी ) करतात आणि त्यांचा बील मीटर वाल्यांना दिला जात आहे, असा आरोप पालघर जिल्ह्यातील शेतकरी वर्ग आणि मजूर वर्गाकडून करण्यात येत आहे तरी संबंधित महावितरण कंपनीकडून या सर्व गोष्टींवर चौकशी व्हावी आणि आम्हा सर्वांना योग्य तो न्याय द्यावा अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.











