रितेश टीलावत ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा : आपले आईवडील-कुटुंब, घरदार,मित्रमंडळी,गाव व सर्व सुखसोयी सोडून देशाच्या सीमारेषेवर खडा पहारा देणारे सैनिक हेच खरे त्यागी असल्याचे प्रतिपादन लोकजागर मंचचे संस्थापक अध्यक्ष अनिल गावंडे यांनी केले.हिवरखेड येथील एका तरुणाची सीमा सुरक्षा दलात तर पाच तरुणांची भारतीय सैन्यदलात अग्निविर म्हणून निवड झाली. त्यांच्या सत्कार कार्यक्रमा त बोलतांना ते पुढे म्हणाले की राजस्थान मधील रणरणते वाळवंट असो की काश्मिर मधील सियाचीन सारखा दुर्गम प्रदेश असो, ऊन,पाऊस,वादळ,वारा अंगावर झेलत सैनिक आपले सरंक्षण करतात. प्रसंगी आपले प्राण सुद्धा अर्पण करतात त्यामुळे तेच खरे त्यागी आहेत.आपण त्यांच्याप्रती कृतज्ञता बाळगली पाहिजे व त्यांचा सन्मान केला पाहिजे असे सुद्धा त्यांनी म्हटले. लोकजागर मंचचे महेंद्र कराळे यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात, सीमा सुरक्षा दलात निवड झालेल्या जयेश दामधर, आणि भारतीय सैन्यदलात अग्निविर म्हणून निवड झालेल्या गौरव भिसे, राहुल गवई,प्रतिक हागे व महेश मसुरकार यांचा व त्यांना मार्गदर्शन करणारे टारगेट अकॅडमी चे प्रा.गौतम इंगळे यांचा सत्कार लोकजागर मंचच्या वतीने करण्यात आला.यावेळी लोकजागर मंचचे मनिष भांबुरकर, मनिष भुडके,प्रा.निखिल भड,दानिश खान,अक्षय ढोकणे, सुनील धुरडे, अभिजीत कराळे,पवन गावत्रे,विनोद सगणे,केशव कोरडे,इत्यादी उपस्थित होते.