आरमोरी येथे महात्मा फुले स्मृतिदिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन
सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली.
आरमोरी : आरमोरी तालुका माळी समाज संघटना व तात्यासाहेब महात्मा फुले बहुउद्देशीय संस्था आरमोरी तथा इतर सामाजिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने तात्यासाहेब फुले दांपत्य प्रतिष्ठान आरमोरी येथे आयोजित स्मृतिदिनाच्या कार्यक्रमांचे प्रसंगी आयोजित क्रांतिसूर्य राष्ट्रपितामह स्मृती दिन शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आले.त्याप्रसंगी अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते.आरमोरी शहरातील महात्मा फुले चौक येथुन महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला प्रतिकृतीला आरमोरी माळी समाज संघटनेचे अध्यक्ष मधुकर ठाकरे सम्राट अशोक फोरम चे जयकुमार मेश्राम, किशोर सहारे, युवारंगचे राहुल जुवारे यांनी प्रतिमेला माल्यार्पण करून महात्मा फुले चौकातून रॅलीची बहुसंख्य समाज बांधवा कडून सुरुवात करण्यात आली जुना बस स्टँड गुजरी ते वडसा रोड वरील तात्यासाहेब फुले प्रतिष्ठान येथे विसर्जित होऊन कार्यक्रमास सुरुवात झाली.पुढे बोलताना बडवाईक म्हणाले की, शिक्षण हा जीवनाचा आधार आहे शिक्षण नसल्याने आपल्या बहुजन समाजाची कोणकोणती आणि कशा प्रकारची हानी झाली शिक्षणा शिवाय माणसाला माणूस म्हणून जगता ही येत नाही स्त्री शिक्षण सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे कारण एक स्त्री शिकली तर पूर्ण घर बदलू शकते एवढी ताकत स्त्री शिक्षणात आहे स्त्री शिक्षणाची पहिली आणि महत्वाची सुरुवात जर कोणी केली असेल तर ती फुले दांपत्याने केली स्त्रियांना शिक्षण देणे हा खरा धर्म आहे असे सुद्धा पुढे बोलताना ते म्हणाले.पुढे सोबतच कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख वक्ते भीमराज पात्रीकर यांनी सुद्धा उपस्थितांना मार्गदर्शन केले ते म्हणाले की सर्व दुःखाचे कारण आपण शोधले तर अज्ञान आणि आपणास समाजाकडे नसलेले नियोजन आहे त्यामुळे येथून पुढे आपण नियोजन आणि शिक्षण एकत्र येऊन समाजाची निरंतर प्रगती साधावी असे प्रतिपादन त्यांनी केले त्यासोबतच जयकुमार मेश्राम सामाजिक कार्यकर्ते आरमोरी यांनीसुद्धा महात्मा फुलेंनी समाजाला जे बलिदान त्यांनी दिले त्यांच्या उपकाराची परतफेड समाजाचा ला करावी लागेल त्यासाठी त्यांनी संकुचित विचार बाजूला सारून समाजाप्रती एकजुटीने कार्य करावे लागेल आपण थोर महापुरुषांचे विचार जयंती पुण्यतिथी एवढ्या पुरतेच मर्यादित न ठेवता जनतेत प्रत्यक्ष कसे रुजवता येईल हे या प्रसंगी आवर्जून सांगितले.त्या सोबतच कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून किशोर सहारे सचिव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती आरमोरी यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत असावे ही संकल्पना त्याकाळात तात्या साहेबांनी मांडली त्यामुळे तळागाळातील दुर्बल वंचित घटकांना आजही शिक्षण मोफत मिळत आहे.ही त्यांचीच देण आहे. थॉमस पेन यांचे राईट ऑफ मॅन ग्रंथाने प्रभावित होऊन त्यांनी मानवजातीच्या विकासासाठी सार्वजनिक सत्य धर्म व स्त्री शिक्षणाचा व आपली संपूर्ण आयुष्य पणाला लावून खर्ची घातले त्या महामानवाला शिक्षण दिन म्हणून साजरा करावा असे यावेळी त्यांनी आवर्जून सांगितले.या कार्यक्रमात पुढे समाजशिक्षक म्हणून भीमराज पात्रीकर पदवीधर शिक्षक यांचा समाजशिक्षक म्हणून गौरवण्यात आले त्यासोबतच जयकुमार मेश्राम सामाजिक कार्यकर्ते आरमोरी यांना शाल महात्मा फुले यांचा जीवन ग्रंथ देऊन समाज शिक्षक म्हणून गौरवण्यात आले आणि किशोर सहारे महात्मा गांधी विद्यालय आरमोरी व सचिव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती यांना बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समाजाप्रती पोहोचवण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी केले.त्यामुळे त्यांना सुद्धा ग्रंथ आणि शाल देऊन गौरवण्यात आले.सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून देवानंद बडवाईक तर प्रमुख वक्ते म्हणून भीमराज पात्रीकर पदवीधर शिक्षक, जयकुमार मेश्राम सामाजिक कार्यकर्ते आरमोरी,किशोर सहारे सचिव बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, प्रमुख अतिथी म्हणून सुधाकर निकेसर सचिव माळी समाज संघटना, मधुकर ठाकरे अध्यक्ष माळी समाज संघटना,राहुल जुवारे अध्यक्ष युवारंग, डॉक्टर मसराम आदिवासी एम्प्लाइज फाउंडेशन बांबोडे,राजेंद्र ठवरे,नंदरधने मॅडम, छाया रामटेके आदी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे संचालन सुरेश वाटघुरे यांनी केले तर प्रास्ताविक गुरुदास बोरूले व आभार मंगलदास कोटरंगे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्योती सावित्री पुरुष बचत गट व सत्यशोधक सावित्री ज्योती महिला बचत गट तात्यासाहेब महात्मा फुले बहुउद्देशीय प्रतिष्ठान बौद्ध समाज संघटना सम्राट अशोक सोशल फोरम आदिवासी एम्प्लॉईज संघटना सर्व सामाजिक संघटनांनी व त्यांच्या सर्व सदस्यांनी मोलाचे योगदान दिले.