शासनाचे लक्ष वेधण्याकरिता बनविले तात्पुरता लाकडी पुल.
सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली.
गडचिरोली/ भामरागड:- गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात अतिदुर्गम आदिवासी बहुल क्षेत्र म्हणून ओळख असलेल्या बिनागुंडा पहाडीवरील परिसर अतीसंवेदनशील दुर्लक्षित भाग आहे.या भागात घनदाट जंगल आणि पावसाळ्यात ओसळून वाहणारे नदी नाले या भागांत पावसाळ्यात अती वृष्टीचे प्रमाण जास्त आहे आणि सततदार पाऊस या परिसरात जवळपास 15 ते 20 दिवस राहतो त्यामुळे नदी नाले भरुन राहतात.अशावेळी बिनागुंडा परिसरातील नागरिकांना गुंडेनुर नाला चार महिण्यासाठी दुतळी भरुन वाहत असल्याने या परिसराचा जगाशी संपर्क तुटतो.मागील 6 वर्षापासून गुंडे नुर गावातील नागरीक बांबू पासुन ताटवे बनवून पुल तयार करायचे माञ यावर्षी नवीन प्रयोग करत लाकूड पाट्याचे पुल बनविले आहेत. हा पुल बांबूच्या पुला पेक्षा मजबूत आहे त्याची लांबी जवळपास 65 मीटर आहे.गुंडेनुर गावातील नागरीक एकत्र येवून ऐकजुटिने दळनवळन करिता लाकडी पुलाची निर्मिती केली आहे.
शासनाने या श्रमदानातुन बनविलेला लाकडी पुलाची दखल घेवून सदर समस्या मार्गी लावावेत अशी मागणी गावकऱ्यांची केली आहे.या नदीवर पुल नसल्यामुळे पावसाळ्यात गर्भवती महिलेला आपले प्राण गमवावे लागले होतेे.हा पुल असता तर कदाचित तिचे प्राण वाचले असते.शासनाने जर हा पुल बनविल्यास तर थेट धबधबा साठी प्रसिध्द असलेले बिनागुंडा परीसर जुळले जाईल. कारण या मार्गावरचा हा एकमेव नदी आहे मोठा बाकी दोन नाले या रस्त्यावर आहेत पण ते काही दिवसात पाणी कमी होते.सदर पुल बनवून आदिवासी बांधव मागील काही वर्षापासून आपल्या कामामुळे आत्मनिर्भर असल्याने दिसत आहेत.सदर पुल बांधकाम साठी नदी आवारातील जवळील जंगलातील लाकूड पाट्या आणि वाक म्हणजे झाडाच्या सालि पासून बनविलेले दोरी आणि आपल्या बुध्दी चा वापर आणि श्रमदानातून हा लाकडी पुल तयार करण्यात आले.बांबू पासुन बनविलेले पाच कालम गोलाकार केले त्यात नदी तील मोठे दगड आणि रेती भरले त्यामुळे हा कालम मजबूत झाला अशा प्रकारचे पाच कालम पाण्यात उभे केले.नदीत भरपुर पाणी वाहत असल्यामुळे खुप अडचण निर्माण झाली होती.माञ गावकऱ्यांची जिद्द सोडली नाही. अखेर हा पुल तयार झाला साधारण पाण्यात वाहून जाणार अशी पुल तयार झाला आहे आणि गावकरी यांच्या चेहरा आनंद दिसत होता.या पुलावरून दुचाकी,पायी जावू शकतो या पुलावर सहज पार करू शकतो असा पुल तयार झालेला आहे.