सादिक शहा
सर्कल प्रतिनिधी रायपुर
बुलढाणा मागील दीड-दोन वर्षापासून बंद असलेली राज्यातील सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळे भाजपाच्या आंदोलनामुळे आज पासून राज्य सरकारला उघडण्यास भाग पडले आहे.या निमित्त आज हिंदू मुस्लिम धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या जगप्रसिद्ध सैलानी बाबांच्या दर्गा चे दरवाजे भाजपा प्रदेश प्रतिनिधी #लोकनेतेविजयराजशिंदे यांच्या हस्ते दर्गाचे कुलूप असंख्य भाविक व भाजपा पदाधिकारी यांच्या उपस्थितीत उघडण्यात आले.यावेळी लोकनेते विजयराज शिंदे व भाजपा पदाधिकारी यांच्या हस्ते सैलानी बाबा दर्गावर चादर चढवून आशीर्वाद घेतले.हा आनंदोत्सव साजरा करतांना यावेळी भाजपा अल्पसंख्या जिल्हाध्यक्ष अनिस भाई ,भाजपा बुलढाणा तालुकाध्यक्ष सुनील भाऊ देशमुख, शंकर भाऊ तरमळे, किसान आघाडी जिल्हा उपाध्यक्ष साहेबराव गवते, अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष शफिक मुजावर, परवेज जमदार, किसन राऊत , रेहान संजरी, खालिद शेख, प्रकाश शेवाळे ,शिवाजी कोरके, रफिक मुजावर ,शकील भाई ,बाबू भाई ,शेख नसीम रायपुर , ई मान्यवरांची उपस्थिती होती.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)