समाधान पाटील
तालुका प्रतिनिधी चिखली.
पोलीस प्रशासनावर नेहमी विविध आरोप केले जात असतात,परंतु सगळे पोलीस सारखे नसतात.कारण की पोलिसा मधे सुद्धा एक माणूस असतो तो, याचीच परचीती आज पाहण्यास मिळाली.
प्राप्त माहिती अशी की अपघात होऊन रस्त्यात जखमी अवस्थेत पडलेल्या एका व्यक्तीला पोलिसांच्या एका पथकाने आपल्या वाहनांमध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
आज 7 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले, API निलेश लोधी. ASI सखाराम सोनुने. पोलिस कर्मचारी माधवराव पेठकर, अमोल सरोदे, व चालक वाघ शहरात पेट्रोलिंग साठी जात असताना चिखली रोड वरील छोटी देवीच्या मंदिरा समोर एक दुचाकी चालक अपघात होऊन खाली पडलेला त्यांना दिसला व दोन तीन लोक त्याचा जवळ उभे होते.
है पाहून तात्काळ पोलिसांनी आपले वाहन थांबवले व त्या अपघात ग्रस्त जखमी व्यक्तीला उचलून जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे, या जखमी व्यक्ती चे नाव प्रवीण विलास भगत असून राहणार भालगाव तालुका चिखली येथील रहिवाशी आहे सध्या जखमीवर उपचार सुरू आहे.