किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पं.स.मुख्याधिकारी व ग्रामपंचायत सचिव यांनी तातडीने घेतली त्यांच्या पत्राची दखल..भरल्या गेले थकीत वीज बिल..
पातुर पंचायत समिती अंतर्गत येणा-या शिर्ला ग्रामपंचायत हद्दीतील गेल्या अनेक महिन्यांपासून सार्वजनिक पथदीवे बंद अवस्थेत होते त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागे.रात्रीच्या वेळेस रस्त्यावर अंधार असल्यामुळे आणी पावसाच्या पाण्याने रस्त्यावरील खड्डे भरल्याने पायी चालणारे लहान मोठे वयोवृद्ध नागरिक यांना तारेवरची कसरत करावी लागत असे अनेक वेळा दुचाकी वाहन यांचे अपघात होवून वाहन चालक यांना इजा होत होती सुदैवाने आतापर्यंत कुठलीही जीवितहानी झाली नाही.ही परिस्थिती बघता आणी नागरिकांचे होणारे हाल बघता कालच निवडून आलेल्या पंचायत समिती शिर्ला गणाच्या नवनिर्वाचित कार्यक्षम पं.स.सदस्या सौ.मनिषाताई अजय ढोणे यांनी नागरिकांना अपेक्षित आणी गरजेच्या मुलभूत प्रश्नांना सोडवण्यासाठी त्यांनी प्रशासनाला दिलेले यासंबंधीचे पत्र व त्या पत्राची प्रशासनाने तात्काळ घेतलेली दखल यावरून नवनिर्वाचित सदस्या यांनी चांगलीच कंबर कसलेली बघावयास मिळत आहे. एकाच दिवसात हा प्रशासनाच्या उदासिनतेमुळे मागे राहीलेला प्रश्न महावितरणचे दोन लाख पंचवीस हजार सहाशे पन्नास रूपयांच्या वीज बिलाचा भरणा करून त्यांचे सक्षम नेतृत्व असण्याचा दाखलाच आज नागरिकांना बघायला मिळाला त्यामुळे सामान्य नागरिकांत आनंदाचे आणी विश्वासाचे वातावरण तयार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
महावितरणने ही ताबडतोब सर्व पथदीवे सुरू करून सणासुदीच्या दिवसांत शहर विद्युत रोशनाईने प्रकाशमान केले आहे.
निवडून येताच पंचायत समितीत पडलेल्या अंधारात प्रकाश टाकला आहे पुढे ही असेच काम त्यांच्या माध्यमातून व्हावे अशी सामान्य नागरिकांनी अपेक्षा त्यांच्या मध्ये दिसत आहे.पं.स.सभापती पदी त्यांचीच वर्णी लागणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात होत आहे.











