किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
उमरी मोठी येथील साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक मंडळाचे विरंगुळा केंद्राचे लोकार्पण 1 ऑक्टोबर या जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनी रणधीरभाऊ सावरकर आमदार अकोला पूर्व यांचे शुभहस्ते उत्साहात संपन्न झाले. याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना त्यांनी सांगितले की आजची तरुण पिढी संस्कारक्षम करण्याचे कार्य ज्येष्ठांनी करावे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष ना.मा .मोहोड होते.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अभि विनायकराव पांडे अतिरिक्त मुख्य सचिव
फेस्कॉम हे होते. त्यांनी आपल्या मनोगतात केंद्र शासनाने सुरू केलेल्या हेल्पलाइनची माहिती दिली. जिल्हा समन्वय समितीचे अध्यक्ष नारायण अंधारे, प्रा. यादव वक्ते प्रमोद देशमुख गजानन खोबरखेडे , तुकाराम गोमासे चंद्रप्रभा फुलारी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन उपाध्यक्ष सोमेश्वर पेठकर यांनी केले. प्रमुख उपस्थितांमध्ये नगरसेवक मिलिंद राऊत, नगरसेविका सौ पल्लवी गावंडे, संदीप गावंडे, संगीतराव गोतमारे, रामभाऊ बिरकड , श्रीकर लाहे, रुपराव भारसाकळे जगदेव अमृतकर, शरद इंगळे, मनोहर गिरी, नंदकिशोर गिरी, विनायक जायले, दशरथ राऊत, ज्ञानदेव खेडकर, हे होते. कोषाध्यक्ष रामकृष्ण इंगळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.











