दिनानाथ पाटील तालुका प्रतिनिधी शहादा
शहादा ता. 15: तालुक्यातील डामरखेडा गावालगतच्या गोमाई नदीवरील पुल कमकुवत झाल्याचा अहवाल आल्याने पुलावरील अवजड वाहतूक बंद करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत. असे असताना प्रशासनाच्या नियमांची पायमल्ली करीत या पुलावरून जड वाहनांची सर्रास वाहतूक सुरू आहे. मात्र एस टी प्रशासनाने दहा रुपयांचे अतिरिक्त भडे करीत कथार्दे, लोणखेडा मार्गे वाहतूक सुरू करीत असल्याने प्रवाश्यांना नाहक आर्थिक भुर्दंड सामोरे जावे लागत आहे. एस टी प्रशासनाने सुद्धा बसेस डामरखेडा मार्गे पुन्हा सुरू कराव्या अशी मागणी प्रवाश्यांनी केली आहे. विसरवाडी ते सेंधवा महामार्गावर डामरखेडा प्रकाशा दरम्यान गोमाई नदीवर इंग्रज काळातील पूल बांधकाम झालेले आह. सदरचे बांधकाम 70 वर्षापेक्षा जास्त झाल्याने पुलाची परिस्थिती खराब झालेली आहे. मेरीच्या तपासणी अहवालानुसार पुलावरून जड वाहने चालवण्यासारखी पुलाची परिस्थिती राहिलेली नाही. पुलावरील ठिकठिकाणी असलेले खड्डे, पिलरला तडे गेले असल्याने वारंवार पुलावरून जड वाहन चालवल्याने हा पूल केव्हाही पडू शकतो असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे दोन महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी या पुलावरील अवजड वाहतूक पूर्णतः बंद करण्याचे निर्देश दिले होते. तसेच कालबाह्य झालेल्या पुलाची दुरुस्ती करिता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्यावेळी दुरुस्तीच्या कामासाठी निविदा काढत रस्ता अवजड वाहनांसाठी बंद करण्याच्या निर्णय घेतल. त्यानुसार अवजड वाहतूक प्रकाशा कडून काथर्दे, भादे, मलोनी, लोणखेडा मार्गे शहादा शहर असे नियोजन अवजड वाहनांसाठी केले. सध्या डामरखेडा लगत गोमाई नदीवर या पुलाला लागून दुसऱ्या नवीन पुलाचे बांधकाम सुरू आहे. रस्ते विकास महामंडळाकडून पुलाची निर्मिती होईपर्यंत प्रकाशा व शहादा येथून जड वाहने वळविण्यात आली आहे. असे असतानाही मध्यंतरीच्या दिवसात परराज्यातून येणाऱ्या जाणारी जड वाहन रात्री बे रात्री सर्रासपणे याच पुलावरून मार्गस्थ होत आहेत. शहादा व प्रकाशा येथे काही वळण ठिकाणी रस्त्यावर लोखंडी बॅरगेटींग लावण्यात आले आहेत. तिथे कोणीही जबाबदार कर्माच्री नसल्याने जड वाहन चालक लोखंडी बेरगेटिंग बाजूला सरकवित तर काहींनी लोखंडी बॅरगेटींगला जोरदार धक्का देत वाहन मार्गस्थ केले आहेत. कालबाह्य पुलावरून जड वाहन बंदी असताना देखील जड वाहन जात येत असल्याने तसेच या वाहनांना जाण्या येण्यास कोण प्रोत्साहित करत आहेत यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त झाल्याने संबंधित ठेकेदाराने पुलाच्या दोन्ही बाजूला मातीच्या गोण्या भरून लावल्या होत्या. त्यात फक्त दुचाकी व लहान चार चाकी वाहने निघतील असा एक भाग मोकळा ठेवण्यात आलेला होता. यातूं लहान वाहन चालकांना या रस्त्याने मार्गस्थ होता येईल असे नियोजन केले होते. गोमाई नदीवर फुलवर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडलेले आहेत. पुलाच्या खाली असलेल्या पिलरला देखील तडे गेल्याने मोठी दुर्घटना होऊ नये करीता दुरुस्तीच्या काम सुरू आहे. असे असताना देखील मध्यरात्री व पहाटे दरम्यान अनेक जड वाहन मोठ्या प्रमाणावर ये-जा करीत आहेत. जड वाहन चालक या पुलाच्या दोघा बाजूस लावलेल्या मातीच्या गोण्यांना सर्रास ठोस मारत, लोकांचा हित करीता तसेच कालबाह्य पुलावर मोठी दुर्घटना टळावी यासाठी जड वाहणे वळण रस्ताने फिरविले असतानांच देखील अनेक जड वाहण चालक जीवाची पर्वा न करता तसेच इतरांना होणारा नाहक त्रासाचा विचाराची तसदी न घेता भरधाव वेगाने वाहन नेत आहेत. गोमाई नदीवरील पूल कालबाह्य झाल्याने अवजड वाहनांना बंद रस्ता करण्यात आला असल्याच्या फलक प्रकाशा व शहादा येथे लावलेले असताना देखील तसेच वळण रस्ता वापर करणारा मार्गदर्शक फलक असताना देखील वाहन चालक या फलकाच्या नियमांचे पालन न करता बॅरिटींगला बाजूला सरकवित वाहन पुलावरून सर्रास नेत आहेत. महाराष्ट्रतून मध्ये प्रदेश व गुजरात राज्याला जोडणारा शहादा ते प्रकाशा दरम्यान डामरखेडा लगत गोमाई नदीवरील पुलाची जड वाहन पेलण्याची क्षमता कमी झाली आहे. कालबाह्य पुलाचे दुरुस्ती काम संथ गतीने सुरु आहे. पुलाचे दुरुस्तीचे काम पुर्ण होऊन जड वाहन चालण्यास पुल तयार होत नाही तोपर्यंत यारस्तावरुन जड वाहाणांस सक्तीतीची बंद करणे आवश्यक आहे. दरम्यान, एसटी बस प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश आल्याबरोबर बस वाहतूक निर्देशित केलेल्या मार्गाने सुरू केल्या. त्यासाठी जास्तीचे दहा रुपये करीत आहे. मात्र, काही बसेस लोणखेडा मार्गे न येता तिखोरा पुलावरून शहादा शहरात जुन्या रस्त्याने येत आहेत. शहरात दिवसा अवजड वाहतुकीला बंदी असताना या बसेस येत असल्याने वाहतूक व्यवस्था विस्कळीत होत असते तरी पोलिस प्रशासन यावर मग गिळून गप्प आहे. जर शहरातून बसेस येत आहेत तर जास्तीची भाडे आकारणी कोणत्या आधारावर आकारली जात आहे असा संतप्त सवाल प्रवाशी करीत आहेत. डामरखेडा पुलावरून सध्या सुरू असलेल्या अवजड वाहतूक लक्षात घेता बसेस ही या मार्गाने पुन्हा सुरू करून वाढीव भाड्यापासून प्रवाशांची सुटका करावी अशी रास्त मागणी होत आहे.