सुमित सोनोने
तालुका प्रतिनिधी मूर्तिजापूर
मुर्तिजापूर : तंत्रज्ञानाच्या युगात शेती आधुनिक पद्धतीने केली जाते.मशागतीपासून ते पीक घरी येईपर्यंत पारंपरिक शेती आजावराची जागा आधुनिक शेती अवजारांनी घेतली आहे. वर्षानुवर्षे चालत आलेली पारंपरिक शेती अवजारे जवळपास नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. नागर,वखर,कोळपणी व बैलजोडी बाळगणे म्हणजे अतिरिक्त ताण या विचाराने कमी मेहनतीत झटपट कामाच्या नादात खर्च अनेक पटीने वाढला आहे.यामुळे शेतीखर्चात वाढ झाली आहे. पूर्वी काळापासून ते मागील काही वर्षात शेतीच्या मशागतीची संपूर्ण कामेही बैलजोडीच्या साहाय्याने केल्या जात होती.नांगरणी,वखरणी,कोळपणी तसेच पेरणी व लागवडीसाठी फुल्ली पाडणे अशा कामासाठी या अवजारांचा वापर केला जात असे. पारंपारिक शेती अवजारांची जागा आता ट्रॅक्टरच्या सहाय्याने होत असलेल्या पणजी,रोटावेटर अशा आधुनिक अवजारांनी घेतली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या खर्चात वाढ झालेली असल्याने उत्पन्नापेक्षा खर्च जास्त अशीच काहीशी परिस्थिती ग्रामीण भागात आहे. कालांतराने लाकडी नागराची जागा लोखंडी नागराने घेतली आहे.तर बैलजोडीच्या साह्याने ओढल्या जाणाऱ्या या शेती अवजारांची जागा आता ट्रॅक्टरने घेतली असून कधीकाळी केवळ मेहनतीच्या बडावर होणारी कामे आता विकतची बनली आहेत. यासाठी एक नांगर जमिनीच्या नांगरणीसाठी शेतकऱ्यांना आजाराच्या जवळपास पैसे मोजावे लागत असून तेवढेच पैसे वखरणीसाठी लागत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेतकऱ्यांची अनेक दिवसांची कामे अगदी काही तासात होत असली तरी, पेरणी व कोळपणी यासारखी अत्यावश्यक कामासाठी आजही बैलजोडी व पारंपारिक शेती अवजाराची गरज असल्याने मशागत व इतर कामांसाठी लागणारा अतिरिक्त ताण व एकंदरीत खर्च पाहता जुने ते सोने म्हणण्याची वेळ शेतकरी वर्गावर येऊन ठेपली आहे. बैलजोडी नसल्याने शेतीची मशागत पैसे मोजून ट्रॅक्टरच्या साह्याने होत असली तरी, काकड पाडणे तसेच डवरणी ही सर्व कामे करण्यासाठी आता बैल जोडी असलेल्या शेतकऱ्यांच्या भरोशावरच राहावे लागते. डवरनी नंतरही नेत्यांचा अतिरिक्त खर्च सोसावा लागतो परिणामी बळीराजा हवालदील झाला आहे.