मनोज भगत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा : राष्टीय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या एन एम,एम, एस या परीक्षेमध्ये हनुमान प्रसाद साह जनता विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला होता. यामध्ये 49 विद्यार्थी या परीक्षेत बसले होते त्यामधील 24 विद्यार्थी पास झाले असून आठ विद्यार्थ्यांना या परीक्षेच्या माध्यमातून स्कॉलरशिप मिळणार असून ते यामध्ये पात्र झाले आहेत. या पात्र झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये अनुक्रमे रेखा वासुदेव वानखडे आदित्य श्रीकृष्ण रौंदळे वैष्णवी संतोष वाघमारे हर्षा प्रवीण राऊत, अभिजीत मोहन रौंदळे, ओम देविदास हागे, वैष्णवी श्याम भालेराव, प्रज्वल भिकाजी सोळंके,हे पात्र झाले आहेत या पात्र विद्यार्थ्यांचे संस्थेचे व्यवस्थापक डॉ, अजय विखे मुख्याध्यापक श्री श्रीराम डाबरे पर्यवेक्षक विलास गावंडे एन,एम,एम,एस प्रमुख श्री काळे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी पास झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.


