सुमित सोनोने
तालुका प्रतिनिधी मुर्तिजापूर
मुर्तिजापूर : तालुक्यातील मधापुरी गावातील शेतकरी दिपक लोखंडे यांच्या शेतामध्ये धामन जातीचा साप विहीरीत ४ दिवसांपासून जखमी अवस्थेत असल्याची माहीती सदर शेतकऱ्यांनी सर्प मित्र शफीखान पठाण यांना दिली.शफी खान पठान यांनी या सापाला विहीरीमधुन मोठ्या सीताफिने बाहेर काढले सदर साप १२ फुट एवढा मोठा होता.सदर जखमी धामन सापाला कुरुम येथील पत्रकार व सर्पमित्र शफिखान पठाण यांनी जिवदान दिले.शेतामधील असणाऱ्या विहीरीमधून त्या धामण सापाला काढून त्यावर उपचार करण्यात आले.सदर धामण साप चार ते पाच दिवसापासून त्या विहिरीमध्ये जखमी अवस्थेत पडला होता.यांची माहीती मधापुरी येथील शेतकऱ्यांनी सर्पमित्र शफिखान पठाण यांना दिले.त्यांनी क्षणाचा विलंब न करता घटनास्थळी पोचून सदर सापाला बाहेर काढून त्या शेतकऱ्याच्या घरी आणून त्या सापावर घरगुती इलाज करून त्यानंतर धामन सापावर उपचार केल्यानंतर सुरक्षित स्थळी धामण सापाला सोडून देण्यात आले.मधापुरी वाशियांकडून सापाला जिवदान दिल्यामुळे ग्रामस्थांकडून शफिखान पठाण व सर्पमित्र सतीश मोरे यांचे आभार मानले.या दोघांनी या धामण सापाला पकडण्याकरिता खूप मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागली.











