जितेंद्र लाखोटीया
ग्रामीण प्रतिनिधी, हिवरखेड
हिवरखेड : विदर्भात एकमेव असलेल्या येथील ऐतिहासिक दोन दिवशीय गणपती विसर्जन मिरवणूक शनिवार, रविवार ११ सप्टेंबर रोजी पार पडली. बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. दोन वर्षानंतर पार पडलेल्या सार्वजनिक मिरवणुकीमध्ये गणेश भक्तांचा प्रचंड उत्साह होता.भव्य दिव्य 14 गणेश मंडळांनी सार्वजनिक गणेश मूर्तीच्या मिरवणूक सहभाग घेतला. दोन दिवस सर्वत्र अभूतपूर्व उत्साहाचे वातावरण होते. प्रथम मानाचा गणपतीचा रथ 116 वर्षाची परपंरा लाभलेला गणपती मठाचा रथ, चंडीका चौक, मोठा महादेव सस्थान, शंकर सस्थान,देवळीवेस, फत्तेपुरीसस्थान,गणेश मडळ कार्लावेश, जयबंजरग गणेश मंडळ भाऊदेवराव गीर्हे नगर, दाईबुबा सस्थान खारोनपुरा, जयभोले गणेश मोठे बारगण, जयभवानी मराठा नगर, स्वस्तीक काॅलनी , इत्यादी मंडळानी मिरवनूकीत सहभाग घेतला. शनिवार राञीला 9 वाजता मिरवनूक राजधानी चौकात असताना पाऊसाने हजेरी लावली. देवळीवेस तर्फे व राजधानी चौकात माजी सरपंच राजेंद्र भोपळे व राजधानी गणेश मंडळ कडून भक्तासाठी नाश्ता व पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच सालाबाद प्रमाने मिरवनूकितील रथ ठरलेल्या वेळेप्रमाने मेनरोड साथीलाईन मधे विश्रांती घेतली. रविवार दिनांक 11/9/22ला दूपारी चार नंतर मिरवनूकीला सुरुवात करण्यात आली. प्रारंभी गजानन संस्थान चा मानाचा 116 वर्ष होत असलेल्या गणरायाचे पूजन करण्यात आले. पारंपारिक भजने, ढोल ताशाच्या निनादात मिरवणूक पार पडली. मेडिकल चौकात गणेश भक्तांसाठी वारी ग्रुप व प्रेस क्लब पत्रकार बांधवांनी चहा,अल्पोहार व पिण्याचे पाणी मोफत वाटप केले. पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला. हिवरखेड मध्ये 30 सार्वजनिक मंडळ द्वारा गणपती स्थापना करण्यात आली होती. प्रत्यक्ष मिरवणुकीमध्ये 14 गणेश मंडळाने सहभाग घेतला. रविवारी रात्री सात वाजताच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली तरीही गणपती भक्तांच्या उत्साहात कमी नव्हती. मिरवणूक दरम्यान एचडीपीओ रितू खोकर, ठाणेदार विजय चव्हाण, पीएसआय गोपाल दातीर, संदीप बलोद,सुनील बागलकर व नायब तहसीलदार राजेश गुरव या प्रशासकीय यंत्रणेचा मोठा बंदोबस्त होता. प्रभारी सरपंच रमेश दुतोंडे ,पोलीस पाटील प्रकाश गावंडे, प्रेस क्लब ज्येष्ठ पत्रकार श्यामशील भोपळे, किरण शेदानी, जितेंद्र लखोटिया, मनीष भूडके, रितेश टीलावत, राऊत सर, केशव कोरडे , राहुल गिरे ,जमीर शेख, बाळासाहेब नेरकर यांच्या हस्ते शांततेसाठी सहभाग होता.शांतता समिती सदस्य,गणेश भक्त व नागरिकांच्या उपस्थितीत समारोप शांतपणे झाला.