सय्यद रहीम रजा
ग्रामीण प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड: दर्पण पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी डॉ.आयुब खान पठाण ,सचिव पदी सतीश कोल्हे ,उपाध्यक्षपदी संभाजी भोयर सर्वानुमते निवड करण्यात आली .शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकीय विश्रामगृहात तालुका पत्रकार संघाच्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी उमरखेड तालुका पत्रकार संघाची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.आयुब खान पठाण प्रमुख पाहुणे म्हणून उप माहिती कार्यालय महाले साहेब सेवानिवृत्ती मुख्याध्यापक यशवंत काळबांडे सर उपस्थित होते .कार्यक्रमाच्या सुरुवातीस आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करण्यात आले. डॉ.आयुब खान पठाण म्हणाले मराठी पत्रकारांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा आदर्श अंगी करावा आजच्या युवा पत्रकारांनी आधुनिक तंत्रज्ञान शिकून स्वाभिमानाने बदलत्या काळाची पत्रकारिता करावी किती साधने बदलली तरी पत्रकारितेचे महत्त्व कधीच कमी होणार नाही .समाजातील प्रत्येक भूमिका निभावावी आणि पत्रकारितेचा स्तंभ आणखी मजबूत करावा असे आव्हान त्यांनी यावेळी केले बैठकीत नवीन कार्यकारिणी घोषित करण्यात आली. बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करण्यात आले सलग दुसऱ्यांदा अध्यक्ष पदी डॉ.आयुब खान पठाण तर सचिव पदी. सतीश कोल्हे उपाध्यक्ष संभाजी भोयर, कोषाध्यक्ष शेख निसार, सहसचिव शेख जमीर मार्गदर्शक डॉ.आंबेजोगाईकर, चुन्नूमीया काजी, नितीन सोनाळे, सय्यद रहीम रजा, सदस्य बाळराज काळबांडे, सय्यद खाजा, दिगांबर मनोहर, बंडू पाटील, कैलास कदम आढागळे, दत्ता सिंगारे, मारुती धुळे इत्यादी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन यशवंत काळबांडे सर यांनी केले तर आभार बाळराज काळबांडे यांनी आभार व्यक्त केले