रवि राठोड
ग्रामीण प्रतिनिधी वाकान
वाकान:
महागाव तालुक्यातील सातघरी येथील काही काळापूर्वी कबड्डी भुषण तालुक्यातच नव्हे तर स्टेट लेवलसह जिल्ह्यात आपले नाव लौकीक करत गाजलेले माहिर कबड्डीचे खेळाडू तथा सातघरी येथील माजी उपसरपंच बळीराम राठोड यांचेच सुपुत्र अमीत बळीराम राठोड यांची ३५ वी सन.ज्युनियर नॅशनल कबड्डी टुर्नामेंट विदर्भ संघात निवड करन्यात आली आहे.ज्युनियर कबड्डी नॅशनल विदर्भ सोनीपत हरियाणा येथे दिनांक २७ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या नॅशनल कबड्डी संघात अमीत बळीराम राठोड रा.सातघरी ता.महागाव यांची निवड करण्यात आली असून यवतमाळ जिल्ह्यातुन नॅशनल ज्युनिअर कबड्डी टुर्नामेंटसाठी निवड होणारा हा एकमेव खेळाडू आहे
कबड्डी असोसिएशन जिल्हा यवतमाळ तर्फे सुवर्णयुग क्रीडा मंडळ यवतमाळ यांचे ग्राउंडवर दिनांक २१ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर पर्यंत झालेल्या कॅम्पमध्ये अमीत बळीराम राठोड सातघरी यांची थेट निवड करण्यात आली.अमीत यांचे वडील बळीराम राठोड हे देखील काही काळापूर्वी कबड्डीचे झुंजार खेळाडू होते.त्याच प्रेरणेतून अमितला देखील लहान पणापासूनच कबड्डीचा छंद व आवड निर्माण झाली.त्यांचे वडीलांची परिस्थिती हलाखीची व अत्यंत वाईट असतांना देखील त्यांनी अमितला कबड्डीसाठी प्रोत्साहन व सच्चा प्रेरणेने सामोरे जान्यास प्रोत्साहित केले.ज्यूनीयर नॅशनल कबड्डी प्लेअर अमितकुमार यांनी आपल्या यशाचे श्रेय आमदार बाळासाहेब मांगुळकर, यवतमाळ यांच्या सह कबड्डी अशो.सचिव नंदुभाऊ वानखडे, सुवर्ण क्रीडा मंडळाचे अध्यक्ष अभय राऊत व आपल्या आई वडिलांना दिले.अमीत राठोड यांची ज्युनिअर कबड्डी नॅशनल विदर्भ संघात निवड झाल्याने त्यांचेवर सुभेछांचा वर्षाव करन्यात येत असुन सर्व स्तरातून अमीतचे कौतुक केले जात आहे.











