रवि राठोड
ग्रामीण प्रतिनिधी वाकान.
महागांव:
तालुक्यातील वाकान येथील पवित्र भुमीमध्ये वास्तव्यास असलेल्या श्री रोहीदास मोहन राठोड यांचे सुपुत्र उच्च शिक्षित सहायक निबंधक या पदावर कोल्हापूर जिल्हात रूजु असलेले प्रेम कुमार राठोड यांनी खरोखरच वाकान गावचे नांव लौकीक करत दिनांक ९ नोव्हेंबर २०२५ रोजी गोवा येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय आर्यन मॅन स्पर्धेत सहकार विभागातील एकमेव असलेले सहायक निबंधक श्री प्रेम राठोड सर हे तिसऱ्यांदा आर्यन मॅन स्पर्धकचे मानकरी ठरले आहे.या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कूल ३७ देशातील १२४७ स्पर्धकांनी सहभाग घेतले होते कोल्हापूर जिल्हातील अर्हता क्लबचे श्री प्रेम राठोड हे सदस्य असुन अर्हता क्लबचे पंकज रवळु आणि आशिष रवळु यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले आर्यन मॅन स्पर्धेकरीता स्विमींग,सायकलींग, आणि रनींग या तिनही क्रीडा प्रकारात तरबेज होऊन विहीत वेळेत स्पर्धा पुर्ण करावी लागते सहायक निबंधक प्रेम राठोड यांनी या आंतरराष्ट्रीय आर्यन मॅन स्पर्धेत सहभाग घेऊन सलग तिसऱ्यांदा मानकरी ठरल्याने त्यांचे सर्व स्तरावरुन कौतुक केले जात आहे वाकान येथील पावन भुमीवर जन्म घेतलेल्या सहायक निबंधक प्रेम राठोड यांनी आंतरराष्ट्रीय आर्यन मॅन स्पर्धेत सहभाग घेऊन तिसऱ्यांदा मानकरी ठरल्याने वाकान येथील नागरिकांमधूनही त्यांचे कौतुक केले जात असुन वाकान वाशीयांसाठी ही बाब अभिमानास्पद आहे.











