जलील शेख
जिल्हा प्रतिनिधी,परभणी
सार्वत्रिक नगरपरिषद निवडणूक पाथरी काँग्रेसच्या प्रचार्थ काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार तथा प्रसिद्ध शायार इमरान प्रतापगडी हे रविवारी म्हणजेच 30 नोव्हेंबर रोजी पाथरीत येत आहेत.अशी माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून वर्तमानपत्रांना दिली आहे. पाथरी काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जुनैद अब्दुल्ला खान दुर्रानी याबरोबरच 23 नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारानिमित्त जिल्हा परिषद मैदान पाथरी येथे सभेचे आयोजन करण्यात आले असून या सभेसाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि पाथरीच्या सुजाण मतदारांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे असे आव्हान या निमित्ताने जुनैद खान यांनी केले आहे.











