महेंद्र गोदाम
ग्रामीण प्रतिनिधी अंबाजोगाई
अंबाजोगाई : तालुक्यातील चंदनवाडी ग्रामपंचायत कार्यालय तर्फे या गावात “मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान “मध्ये गावातील नागरिक गेली अनेक आठवडे ग्रामस्थ मेहनत घेत आहेत, यामुळे गावातील नागरिक “आपलं गाव स्वच्छ गाव सुंदर गाव “अशी मोहीम राबवत आहेत, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत गावात गेल्या काही आठवड्यांपासून सुरू असलेली विकासाची वाटचाल आता अधिक बळकट झालेली दिसत आहे. ग्रामपंचायत, ग्रामस्थ, शाळा, महिला बचत गट, युवक मंडळे अशा सर्व घटकांनी एकत्र येत गावाच्या प्रगतीसाठी दिलेला हात आणि दाखवलेली एकजूट प्रेरणादायी ठरत आहे. या अभियानाची सुरुवात स्वच्छता, शिस्त आणि सामूहिक सहभाग या तीन मूलभूत स्तंभांपासून झाली. पहिल्याच आठवड्यात गावात स्वच्छता मोहिम राबवून सार्वजनिक रस्ते, पाणी स्रोत, दफनभूमी, शाळा परिसर स्वच्छ करण्यात आले. जनजागृती रॅलीद्वारे प्रत्येक घरापर्यंत कचरा व्यवस्थापनाचे महत्त्व पोहोचवले गेले आहे गावातील अनेक भागांमध्ये हा बदल दिसून येऊ लागला आहे ,या उपक्रमाद्वारे मागील 10ते 11 रविवार अखंडीतणे स्वच्छता करण्यात आलेली आहे,गावाचा भौगोलिक भाग लोकसंख्या आणि या प्रमाणात ठिकठिकाणी पडलेल्या कचर्याची विलेवाट लावलेली आहे.
यानंतर लोकवर्गणीच्या माध्यमातून गाव विकासाला आर्थिक बळ मिळाले आहे. ग्रामस्थांनी मनापासून सहकार्य करत रस्ते दुरुस्ती, मंदिर सौंदर्यीकरण, शाळांमध्ये मुलभूत सुविधा, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आवश्यक सुविधा अशा अनेक कामांना हातभार लावला आहे. आठवड्यानुसार विविध उपक्रम राबवून गावात हळूहळू सकारात्मक बदल येऊ लागला आहे, आठवड्यांत डस्टबिनचे वाटप केले,जिल्हा परिषद अंगणवाडी शाळेसाठी थ्रीडी चित्रे रांग्रोंगोटी केलेली दिसून येत आहे ,ओला-सुका कचरा वेगळा करण्याचे प्रशिक्षण गावातील सार्वजनिक ठिकाणी फलक आणि बॅनरद्वारे स्वच्छतेचे संदेश देण्यात आले. ग्रामस्थांनी अंगणवाडी परिसर स्वच्छता, तर शाळकरी मुलांनी स्वच्छतेचे महत्व सांगणाऱ्या कृतीद्वारे आपला सहभाग नोंदवला आहे. अभियानामुळे गावात स्वच्छतेसोबतच एकोपा, जबाबदारी आणि प्रगतीचा नवा संदेश पसरला आहे ग्रामपंचायतीने प्रत्येक उपक्रमाची जबाबदारी पारदर्शकपणे पार पाडत ग्रामस्थांचा विश्वास जिंकला. आज गावात स्वच्छ रस्ते, सुशोभित सार्वजनिक ठिकाणे आणि एक सजग नागरिक म्हणून उभा असलेला प्रत्येक ग्रामस्थ ही या अभियानाची मोठी कमाई आहे.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानातून गावाच्या विकासाला नवी गती मिळाली असून, “आपलं गाव – आपली जबाबदारी” हा संदेश आता खऱ्या अर्थाने रुजलेला दिसत आहे. पुढील काळातही ही विकासाची वाटचाल अशाच सहकार्याने आणि उत्साहाने सुरू राहील, असा विश्वास ग्रामपंचायतीने व्यक्त केला आहे.











