योगेश मेश्राम
तालुका प्रतिनिधी चिमूर
चिमूर : ग्रामगीता महाविद्यालय, चिमूर येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा 26 नोव्हेंबर हा दिन “संविधान दिन” म्हणून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य, डॉ. सुनंदा आस्वले व प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. हरेश गजभिये, राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय, चिमूर व प्रा. डॉ. संदीप सातव, प्रा. डॉ. हुमेशवर आनंदे व प्रा. डॉ. निलेश ठवकर उपस्थित होते. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी संविधान दिनाचे महत्त्व व त्याची व्याप्ती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी, देशासाठी केलेल्या योगदान व कार्याबद्दल मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे इतर प्रमुख पाहुण्यांनी सुद्धा आपल्या मार्गदर्शनातून संविधान दिनाचे महत्त्व पटवून दिले. या कार्यक्रमाचे संचालन व आयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख, प्रा. डॉ. सुमेध वावरे यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन प्रा.समीर भेलावे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी आपली उपस्थिती दर्शवली.











