योगेश मेश्राम
तालुका प्रतिनिधी चिमूर
चिमूर : तालुकांतर्गत असलेल्या मौजा पळसगांव येथे अखिल भारतीय बौद्ध महासभा शाखा तर्फे संविधान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी डॉ.बाबासाहेब आंबेडकर,महात्मा ज्योतीबा फुले,तथागत गौतम बुद्ध, सावित्रीआई फुले,छत्रपती शिवाजी महाराज,वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.संविधान दिनानिमित्तच्या कार्यक्रमाला मान्यवरांनी सविस्तर मार्गदर्शन केले.कार्यक्रमाप्रसंगी ग्रामपयांचत पळसगांवच्या सरपंच सरिता गुरुनुले,पळसगांवचे पोलीस पाटील रागिना दडमल,गावातील प्रतिष्ठीत नागरिक संपत येन्सुरे, ग्रामपंचायतचे माजी सदस्य शंकर वाडगुरे,अखिल भारतीय बौद्ध महासभा शाखेचे अध्यक्ष कैलास खोब्रागडे,अखिल भारतीय बौद्ध महासभा शाखेचे सचिव सचिव संजय जूमळे,महामाया महिला मंडळचे अध्यक्ष जयवंता रामटेके,महामाया महिला मंडळचे सचिव लता खोब्रागडे,मनोहर मेश्राम,बटाऊ शेंडे,महादेव पाटील,सिध्दार्थ रामटेके,प्रदिप गजभिये,नरेश पाटील,सुनिता पाटील,उपासंक उपासिका व गावातील नागरीक आवर्जून उपस्थित होते.











