गजानन माळकर
तालुका प्रतिनिधी मंठा
जालना-जिंतूर या महामार्गा वर वाटूर फाटा ते जिंतूर पर्यत रखडलेले रोडच्या चौपादरीकरणाचे काम चालू आहे. त्यामध्ये मंठा येथील जुने कोर्ट आणि शासकीय विश्रामग्रह समोर अतिक्रमण धाराकांनी आपले दुकान हॉटेल रस्त्यावर मांडले असल्याने येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या आणि नागरिकांना खूप त्रास होत आहे. रोडवरील कामगारांना सुद्धा काम करताना मोठी अडचण निर्माण होत आहे.तरी नगरपंचायत आणि तहसीलदार यांनी यांची दखल घेऊन अतिक्रमण हटवावे अशी मागणी नागरिक करत आहेत.


