बिहारीलाल राजपुत
तालुका प्रतिनिधी भोकरदन
भोकरदन : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागामार्फत राज्यातील वृध्द कलावंताना सन १९५४ – ५५ पासून वृध्द कलावंत मानधन योजने अंतर्गत दरमहा मानधन दिले जाते . मानधन प्राप्त कलावंताना एप्रिल व माहे सप्टेंबर मध्ये हयातीचा दाखला पंचायत समितीला सादर करावा लागतो. बऱ्याच कलावंताना बॅंक खात्याच्या त्रुटींमुळे किंवा आधार लिंक नसल्याने मानधन वेळेवर मिळण्यासाठी अडचन निर्मान होत आहे अशी माहिती संबधीत विभागाचे लिपिक श्री एस.एम.सोनवने यांनी आत्मानंद लोककला मंच आव्हाना चे अध्यक्ष शाहीर बिहारीलाल राजपुत यांना दिली आहे. या संबधी शाहीर राजपुत यांनी मा. गटविकास अधिकारी श्री सुरडकर साहेब यांचेशी सविस्तर चर्चा केली असता त्यांनी सांगितले की,सदर अडचन दुर व्हावी व कलावंताना वेळेवर मानधन मिळावे म्हणून शासनानेही एक पत्र दिले आहे. यापुढे कलावंताना D.B.T म्हणजेच ( Direct Benifishri Transfer ) पध्दतीने मानधन अदा करावयाचे आहे त्यासाठी शासनकडून एक ॲप तयार केले जाणार आहे व त्यात मानधन घेणाऱ्या कलावंताची संपुर्ण माहिती संगणकीय अद्यावत केली जाणार आहे. तेंव्हा हयातीचा दाखला सादर करते वेळी कलावंतानी आपले आधारकार्ड झेराॅक्स व फोन नंबर आणी आय एफ एस सी कोडसह बॅंक खाते नंबर पंचायत समितीला द्यावे व पंचायत समिती सर्व कलावंतांची एकत्र केलेली माहिती शासनाला सादर करेल,जेणे करुण मानधन अदा करायला वरीष्ठ कर्यालयाला सुलभता होईल.कलावंतानी दिनांक ५ जुलै पर्यंत खाते नंबर,आधार नंबर,फोन नंबर व हयातीचा दाखला सादर करावा असे आवाहन भोकरदन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री सुरडकर यांनी केले आहे.