गोविंद खरात
शहर प्रतिनिधि अंबड
येथील श्रीमती चंद्रप्रभा स्वरूपचंद कासलीवाल जैन इंग्लिश स्कूलचा २०२२-२३ यावर्षीचा इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के घोषित झाला.
शाळेतून प्रथम क्रमांक राहुल राठोड ९५.४०% , अग्रवाल हर्ष ९४.६०% द्वितीय, तर तृतीय मुक्ती जैन ९४.४०% व सार्थक राहाटगावकर ९४. ४०% गुण मिळवून उत्तीर्ण झाले.
शाळेतील एकूण ७७ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी ७२ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवले. तर ०४ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीत स्थान मिळवले तसेच द्वितीय श्रेणीत ०१ विद्यार्थ्यांनी स्थान मिळवले या यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे अध्यक्ष डॉ.प्रविणकुमार कासलीवाल, शिरीष सावजी,प्रवीण बाकलीवाल,संजय चांदीवाल,सुरेश दिडपोळे,राजेंद्र काला,डॉ. नरेश अग्रवाल,डॉ.संतोष मोहळे,चंद्रप्रभू दिडपोळे,संजय इंचूरे,मुकेश सावजी,संतोष बाकलीवाल,दिपक पाटणी,भूषण काला,डॉ. अनिल पांडे आदींसह मुख्याध्यापक अन्वर इकबाल सिद्दिकी ,सर्व शिक्षकांनी व पालकांनी अभिनंदन केले आहे.