अविनाश पोहरे
ब्युरो चिफ,अकोला
पातुर : ०२ जून 2023 तुळसाबाई कावल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पातुर चा नुकताच माध्यमिक शालांत परीक्षा निकाल लागलेला आहे त्यामध्ये तुळसाबाई कावल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पातुर एकूण निकाल- 96.61% एकूण विद्यार्थी संख्या – 177 प्राविण्य श्रेणी प्राप्त विद्यार्थी- 138 प्रथम श्रेणी प्राप्त विद्यार्थी- 25 प्रेरणा मदन राठोड 473 94.60 हरी ओम संजय काळे 472 94.40 यशस्वी धरमसिग राठोड 471.94.20 सेजल राजेश आनकर 470. 94, स्वरा राजेंद्र टाले 468.93.60 विद्यालयातून प्रथम क्रमांक प्रेरणा मदन राठोड हिला पुढील आयुष्यामध्ये वैद्यकीय सेवेमध्ये प्रवेश करून गरीब दिन दलितांची सेवा करायची इच्छा आहे. सोबतच हरिओम संजय काळे ला अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये करिअर करायचे आहे सोबतच गाव आणि जिल्ह्याचे नाव सुद्धा रोशन करायचे आहे. यशस्वी राठोड ला स्पर्धा परीक्षा देऊन प्रथम श्रेणी अधिकारी बनायचे आहे आणि देशाची सेवा करायची आहे. विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक केले विजयसिंह गहिलोत व्यवस्थापक बेरार एज्युकेशन सोसायटी, पातुर स्नेहप्रभादेवी गहीलोत सचिव, विद्यालयाचे प्राचार्य अंशुमन सिंह गहिलोत, उपप्राचार्य एस.बी चव्हाण उपमुख्याध्यापिका आर.एस ढेंगे ,पर्यवेक्षिका एम.बी परमाळे यांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय शाळेचे प्राचार्य शिक्षक वृंद आणि आई-वडिलांना दिले.