सत्यपाल वाघमारे
तालुका प्रतिनिधी खेड
चाकण तालुका खेड -बिरदवडी येथील जोतिबा एज्युकेशन सोसायटी संचलित बा मा पवार माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता दहावी बोर्ड चा निकाल 98.50 टक्के लागला याही वर्षी विद्यालयाने उज्वल निकालाची परंपरा कायम राखली असून या शाळेतून साहिल नवले या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक मिळविला असून त्यास 84.20% गुण मिळाले तर द्वितीय क्रमांक सातपुते दुर्गा हीने मिळवला तिला 75.20% गुण मिळाले तर तृतीय क्रमांक प्रांजली पडवळ आणि ओमकार फडके यांनी मिळवला यांना प्रत्येकी 74.20% गुण मिळाले
दरम्यान उज्वल निकालाची परंपरा या विद्यालयाने कायम राखल्यामुळे सर्व यशवंत गुणवंत विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे संस्थेच्या अध्यक्षा प्राध्यापक देवयानी पवार मॅडम सचिव ईशांत यशवंत पवार तसेच विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक सर्व शिक्षक वृंद व सर्व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले हे पुढील यशस्वी करिअर साठी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या अशी माहिती वर्गशिक्षक दादासाहेब ढाकणे यांनी दिली