बबनराव धायतोंडे
जिल्हा प्रतिनिधी पुणे
दौंड= जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याची पूर्वतयारी दरम्यान, दौंड तहसीलदार मा अजित दिवटे, यांच्या सह यवत पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दौंड तालुक्यातील पालखी मुक्काम व विसावा या ठिकाणच्या गावांना भेटी देऊन, स्थानिक परिस्थितीचा आढावा घेतला.पुणे सोलापूर महामार्गावरील दौंड तालुक्यातील मौजे बोरीभडक, कासुर्डी, यवत, भांडगाव, चौफुला, वरवंड, पाटस, रोटी, हिंगणी गाडा, वासुंदे, या गावांमध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचा मुक्काम व विसावा पूर्वीपासून असल्याने, स्थानिक पातळीवर संबंधित विभागाचे अधिकारी, तसेच गावातील ग्रामस्थांकडून पालखी सोहळ्याचे आगमन होण्यापूर्वी स्थानिक आढावा घेण्यात आला, या प्रसंगी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक मंडल अधिकारी, गाव कामगार तलाठी, महावितरण विभाग अधिकारी, अग्निशामक दलाचे अधिकारी, आरोग्य विभाग अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी, तसेच रस्ते विभाग अधिकारी, गाव पोलीस पाटील, प्रामुख्याने उपस्थित होते.जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या पूर्वतयारी संदर्भात ग्रामस्थांच्या सूचना व अडीअडचणी जाणून घेतल्या जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आगमन होण्यापूर्वी गाव पातळीवरील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना पूर्व तयारीच्या सूचना करण्यात आल्या आहेत तसेच मंगळवार दिनांक 6 जून रोजी दौंड पुरंदर उपविभागीय अधिकारी डॉक्टर मिनाज मुल्ला हे पुणे सोलापूर महामार्गावरील पालखी मुक्काम व विसावा या ठिकाणी भेटी देऊन आढावा दौरा करणार असल्याचे दौंड तहसीलदार अजित दिवटे यांनी स्थानिक विभाग अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. याप्रसंगी यवत मंडल अधिकारी भानुदास येडे, केडगाव मंडल अधिकारी किशोर परदेशी, पाटस मंडल अधिकारी सुनील गायकवाड, दौंड पंचायत समितीचे बाबर, ग्रामविकास अधिकारी बबन चकाले, सर्व गाव कामगार तलाठी प्रामुख्याने उपस्थित होते.


