माजी मंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी भेटीनंतर सरकाराकडून ग्रिन सिग्नल …
सागर मूलकला, जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
सिरोंचा :- तेलंगाना सरकारने सिरोंचा तालुक्यातील पोचमपल्ली येथे गेल्या पाच वर्षाआधी मेडिगट्टा धरणाचे बांधकाम केलें आहे, त्या धरणामुळे सिरोंचा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आणि गेल्यावर्षी अतिवृष्टी अनेक गाव पाण्याखाली आले होते. तेलगानां सरकार कडून सिरोंचा तालुक्याचे शेतकऱ्यांचे जमीन अधीग्रहण प्रक्रिया थांबवून शेतकऱ्यांचे जमिनीचे योग्य मोबदला देण्यास तयार नव्हते. यासाठी जमीनचे मोबदला आणि अन्य मागण्यासाठी मागील चार महिन्या आधी सुमारे एक महिना पर्यंत मेडिगट्टा प्रकल्प पीडीत शेतकऱ्यांनी तहसील कार्यलय समोर साखळी उपोषण केलें होते. त्याच दरम्यान पीडित शेतकऱ्यांनी नागपूर अधिवेशनला जाऊन राज्याचे उप मुख्यमंत्री, अर्थमंत्री तथा जिल्हाचे पालकमंत्री देवेंद्रजी फडणवीस याचे भेट घेऊन त्यांचे समस्याचे निवांरण करण्याचे मागणी केली होती. तेव्हा फडणवीस यांनी लवकराच तुमच्या समस्याचे निवांरण केले जाईल असे आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी उपोषण स्थगिती केलें होते. परंतु तेलंगाना सरकाराकडून पीडीत शेतकऱ्यांचे 26 करोड रु देण्याचे प्रकिया टाळाटाळ करीत असून शेतकऱ्यांचे जमीन अधिग्रहण मोबदला मिळण्याउशीर होत असल्याने पुन्हा एकदा पीडीत शेतकऱ्यांनी उपोषणाची घोषणा करीता तहसील कार्यालय समोर उपोषणाला बसले आहे, याची माहिती जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राजे अंब्रीशराव आत्राम यांना मिळतच उपोषण स्थळी भेट देऊन शेतकऱ्यासोबत चर्चा केली, आधी तेलंगाना सरकार कडून महाराष्ट्र सरकारला प्राप्त झालेले 11 करोड रक्कम आणि उर्वरित 26 करोड रक्कम मी राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्रजीं फडणवीस यांचे भेट घेऊन लवकराच शेतकऱ्यांना कसा न्याय मीळेल याबद्दल सविस्तर चर्चा करून तुमच्या मागण्या पूर्ण होईल असे आश्वासन देऊन उपोषण स्थळापासुन मुंबईला रवाना झाले. मुंबईत राज्याचे उप मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जिल्हाचे माजी पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भेट घेऊन सविस्तर चर्चा केली आहे,सदर चर्चेला यश प्राप्त झालं असून तेलंगाना सरकार कडून 26 करोड रक्कम मिळण्यास उशीर होत असल्याने सदर रक्कम महाराष्ट्र सरकार कडून मेडिगट्टा पीडीत शेतकऱ्यांना लवकरच मिळणार आहे. शेतकऱ्यांनी आप आपले जमिनीचे सातबारा व समत्ती पत्र शासनाकडे जमा करून रजिस्ट्री करून घ्यावे जेणे करून लवकरात लवकर शेतकऱ्यांचे खात्यात रक्कम जमा होणार आहे, स्थनिक प्रशासन तर्फे तहसीलदार शिकतोडे आणि जिल्हाधिकारी यांचे मेडिगट्टा पीडीत शेतकऱ्यांचे समस्याचे वेळोवेळी पाठपुरावा केलें आहे.
मेडिगट्टा पीडीत शेतकऱ्यांकडून शासन व प्रशासनाचे तसेच माजी मंत्री राजे अम्ब्रिशराव यांचे आभार मानले जात आहे,