अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
पातुर :- अकोला पातूर रोडवर निंबाच्या झाडाला गळफास घेऊन एक तरुण मृतावस्थेत असल्याचे
आज दिनांक 2 जून 2023 रोजी पातूर / अकोला रोडवर असलेल्या माऊली बार जवळ मानमोडे यांच्या शेतातील निंबाच्या झाडाला एक तरुण झाडाला गळफास घेतल्याने मृतावस्थेत असल्याचे तेथील शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले असता घटनेची माहीती त्यांनी पातूर पोलिसांना दिली.सदर माहितीवरून पातूर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा करून प्राथमिक तपास केला असता मृतकाचे नाव देवेश किसन उंबरकार (वय 21) राहणार पाटील मंडळी, पातूर येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. सदर युवक हा ऑटोरिक्षा चालवीण्याचा व्यवसाय करीत असून दररोज प्रमाणे आज सकाळी ऑटो घरून निघाला मात्र त्याने अचानकपणे आत्महत्येचा निर्णय घेतल्याने नातेवाईकांना धक्काच बसला असून या आत्महत्येमागे काही गूढ आहे का याचा शोध पातूर पोलीस घेत आहेत.दरम्यान पातूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गजानन पोटे, पो.हे.कॉ.तारासिंग राठोड, पो. कॉ. प्रशांत सिरसाट, पो.कॉ. श्रीकांत पतोंड, अंभोरे मेजर, वाकोडे मेजर यांनी स्थानिकांच्या मदतीने मृतदेह खाली काढून उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे पाठविला असून पुढील तपास पातूर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार हरिष गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पातूर पोलिस करीत आहेत.