रितेश टीलावत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा : उन्हाळ्याच्या प्रदीर्घ सुटीनंतर स्थानिक सहदेवराव भोपळे विद्यालयामध्ये चिमुकल्यांच्या किलबिलाने शाळेचे आवार पुन्हा एकदा गजबजले.यावेळी नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ,खाऊ व नवीन पुस्तके देऊन स्वागत करण्यात आले.स्वागत सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिलकुमार भोपळे, प्रमुख उपस्थितीत संस्थेचे कार्यवाह श्यामशील भोपळे, सहकार्यवाह स्नेहल भोपळे,प्राचार्या रजनी वालोकार, नवनियुक्त पर्यवेक्षक प्रा.संतोषकुमार राऊत हे होते. आपल्या प्रास्ताविकातून प्राचार्या वालोकार यांनी केंद्रप्रमुख मनीष गिऱ्हे यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार प्रवेशोत्सवाचे आयोजन केल्याचे सांगूनविद्यार्थ्यांना भावी शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात. तसेच उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक सत्राच्या शुभेच्छा देत शिक्षण क्षेत्रातील नवीन आव्हाने स्वीकारण्याचा व चांगला नागरिक स्वतःमध्ये रुजविण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले.याप्रसंगी शाळेतील शिक्षक निलेश गिऱ्हे,निलेश कासोटे, सुनील वाकोडे,निखिल भड, मयूर लहाने, अमोल दामधर , शिक्षिका पद्मा टाले,आरती इंगळे आदी शिक्षक शिक्षिका व कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन गणेश खानझोडे तरआभार प्रदर्शन स्वप्नील गिऱ्हे यांनी केले.


