कैलास श्रावणे
तालुका प्रतिनिधी पुसद
पुसद : तालुक्यातील तीर्थक्षेत कोडेश्वर महादेव देवस्थान जणूना येथे गुरु पूर्णिमा निमित्त दिनांक 3 जुलै 2023 सोमवारला वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. वृक्षारोपणाच्या या कार्यक्रमाला ग्रामपंचायत जमुना, सिंगरवाडी, धानोरा, जमशेदपूर ,गाजीपुर, आणि येलदरी या पंचक्रोशीतील या पंचक्रोशीतील ग्रामपंचायत सहकार्य लाभले आहे .या वृक्षारोपणाचा कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार मा. इद्रनिल नाईक,उपवनसंरक्षक ,आर.एफ.ओ.प्रविण राऊत , राष्ट्रवादीचे नेते बाबूसिंग आडे, गटविकास अधिकारी संजय राठोड , तहसीलदार महादेव जोरवर ,वायजे अकॅडमी चे संचालक युवराज जाधव ,डॉक्टर एम आर मेघावत ,सहाय्यक गट विकास अधिकारी पिंपळे इत्यादी उपस्थित राहणार आहे, वृक्षारोपणाचा कार्यक्रमानंतर देवस्थानाकडून महाप्रसादाचा कार्यक्रम राहणार आहे. याच कार्यक्रमात स्वामी लोकेशानंद पुरोजी महाराज यांचे पर्यावरण या विषयावर प्रबोधन होणार आहे तरी परिसरातील सर्व जनतेने व भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन कोडेश्वर देवस्थानाचे महंत लोकेशानंद पुरोजी महाराज यांनी केले आहे.