मनोज भगत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा : प्रेस क्लब, आजी-माजी संघ व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे अभ्यासकेंद्र सहदेवराव भोपळे कनिष्ठ महाविद्यालय,हिवरखेड यांच्या संयुक्त विद्यमाने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती पत्रकार दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिलकुमार भोपळे, प्रमुख उपस्थितीत प्राचार्या रजनीताई वालोकार,प्रेस क्लबचे अध्यक्ष रितेश टीलावत, आजी-माजी सैनिक संघाचे अध्यक्ष दीपक कवळकार, माजी प्राचार्य राजेंद्र तायडे,संस्थेचे संचालक प्रकाश खोब्रागडे, संचालक स्नेहल भोपळे हे होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर याच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या प्रास्तविकात प्रेस क्लबचे संस्थापक श्यामशील भोपळे यांनी पत्रकार सामाजिक जनजागृतीसह विविध माध्यमातून समाजातील व्यक्तीच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा कार्यगौरव करीत असल्याचे सांगितले. या दिनाचे औचित्य साधून पत्रकारिता, सामाजिक व शैक्षणिक कार्याबद्दल पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यात देशसेवेच्या कार्याबद्दल भोपळे विद्यालयाचा माजी विद्यार्थी भारतीय सेनेत कार्यरत आर्मी कॅप्तन डॉ.ऋषिकेश राजेंद्र तायडे, उत्कृष्ठ शैक्षणिक कार्यातील योगदानासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने सावित्रीची लेक पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या आदर्श शिक्षिका सौ.साधनाताई श्यामशील भोपळे, सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रातील कार्यासाठी राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविल्याबद्दल किरण लालजी सेदाणी व जितेंद्र लाखोटीया यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी श्रीमती रतनबाई कानुगा शाळेचे मुख्याध्यापक जगत व्यवहारे ,शिक्षक रवींद्र सोळंके, प्रेस क्लबचे गणेश अग्रवाल, गोवर्धन गावंडे, मनीष भुडके,बाळासाहेब नेरकर,राजेश अस्वार, मनोज भगत, फारूक सौदागर,सतीश इंगळे, प्रशांत भोपळे,जमीर शेख, शहजाद खान,प्रदीप पाटील यांच्यासह आजी-माजी सैनिक संघाचे भटकर, बहाकर, गोपाल भोंगाडे आदीजण उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गणेश खानझोडे व प्रशांत भोपळे यांच्या मार्गदर्शनात गणेश भोपळे, गजानन पवार, निलेश दांडगे,अनंता भोपळे आदी शिक्षक व कर्मचारी वृंदाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे संचालन निखील भड व आभारप्रदर्शन संतोषकुमार राऊत यांनी केले.