मिलिंद कांबळे
तालुका प्रतिनिधी किनवट
किनवट : तालुक्यातील सारखणी येथे समाज बांधवांकडून भारतीय संविधान दिन गावातील सर्व समाज बांधवांच्या उपस्थिती मध्ये मोठ्या हर्षवलासाने साजरा करण्यात आला, सर्वप्रथम सारखणी गावाचे प्रथम नागरिक सूर्यभान सीडाम यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले व महापुरुषां च्या तैलचित्रांना पुष्प वाहून अभिवादन करण्यात आले, त्यानंतर भारतीय संविधान दिनाचे महत्त्व उपस्थित असलेल्या मान्यवरांनी आपल्या शब्दांमध्ये वर्णन केले भारतीय संविधान हे आशिया खंडातील सर्वात मोठे लिखित संविधान असून या संविधानामुळे भारतामध्ये सर्वात मोठी लोकशाही प्रस्थापित झाली आहे आणि या संविधाना मुळे आज आपल्याला सर्व मौलिक अधिकार स्वातंत्रता समता बंधुता व एकात्मता आपल्याला संविधानाने दिलेले आहे, भारतीय राज्यघटनचे शिल्पकार परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना घटना लिहिण्यासाठी दोन वर्ष 11 महिने 18 दिवस लागले होते मोठ्या अफाट कष्टाने बाबासाहेबांनी भारतामधील सर्व जाती धर्माचा पंतांचा समूहाचा विचार करून संपूर्ण मानव जातीसाठी कल्याणकारी अभिव्यक्ती स्वतंत्र असलेली सुंदर राज्यघटना भारताला दिलेली आहे असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले, त्यानंतर सामूहिक तिशरण पंचशीला घेऊन भारतीय संविधानाची प्रत पत्रकार सिद्धार्थ मनेश्वर यांनी वाचन करून प्रत्येकांनी संविधाना नुसार आचरण करण्याची शपथ दिली, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद कांबळे यांनी केले तर व पंजाब कांबळे यांनी आभार प्रदर्शन केले या कार्यक्रमाला साठी पत्रकार त्र्येबंक पूनवटकर दयानंद कांबळे युवराज कांबळे नवीन वाघमारे संतोष भवरे नरेंद्र कांबळे मिलिंद राऊत सूमेद मानकर भारत भवरे सतीष भवरे नितीन कांबळे रीतेश कांबळे ओमकार कांबळे किरण कांबळे पांडुरंग कांबळे सर दत्ता कावळे गावातील समाज बांधव प्रतिष्ठित नागरिक बंधू आणि भगिनीं मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते.











