अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
पातूर : पातूर शहरातील उद्योग करणारे कलश पान एंटरप्राइजेस संचालक अगदी छोटया व्यवसायापासून तर मोठ्या व्यापाऱ्यापर्यंतचे नाव संपूर्ण पातूर तालुक्यात नाव कमविणारे निरंजन बंड हे व्यक्तिमत्व जनसामान्य नागरिकांनासोबत मनमिळावू स्वभावामुळे ओळखले जातात. गेल्या चार-पाच वर्षापासून शिवसेना पक्षांमध्ये निस्वार्थ सेवा देत यशस्वीपणे राजकीय क्षेत्रात आपला पायंडा मजबूती ने रोहत पातुर शहरातील व्यापारी संघटनेत तळागळातील व्यापाऱ्यांनच्या समस्यांना सुद्धा वाच्या फोडण्यासाठी अग्रेसर भूमिका घेत अनेक व्यापाऱ्यांच्या आर्थिक यशस्वीपणे दृष्ट्या प्रबळ करून व्यापाऱ्यांना साथ देत पार करण्याचे काम व्यक्तिगतरीत्या करून व्यापारी संघटनेत महत्वाची भूमिका बजावत आहेत असा सामान्य माणूस म्हणून जगताना अनेक संकटं आली परंतु न डगमगता तोंड देत यशस्वीपणे राजकीय क्षेत्रात नव्याने पाऊल ठेवले या सर्व गोष्टींचा विचार स्थानिक आमदार नितीन देशमुख यांनी घेत एक पक्षाची जबाबदारी संपूर्णपणे निरंजन बंड यांना पातूर शहर पक्ष प्रमुख पदी निवड केली आहे. तसेच पक्षातील कार्यकर्ते यांनी सुद्धा निरंजन बंड यांच्या नावाची शिफारस पक्षातील वरिष्ठांसमोर मांडली.पातुर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक येणार असून शिवसेना ठाकरे गटाने येणाऱ्या निवडणुकीत एक मोठी जबाबदारी निरंजन बंड यांना सोपवली आहे या सर्व यशस्वी शहर प्रमुख पदी निवडीचे श्रेय पातुर शहरातील सर्व शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते तसेच स्थानिक आमदार अकोला जिल्हाप्रमुख नितीन देशमुख व खासदार अरविंद सावंत यांना देत आहेत.