अभ्युदय फाउंडेशन देणार निशुल्क सेवा
किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातूर : येथील हिंदू स्मशानभूमी येथे अस्थी कलश ठेवण्याची व्यवस्था करण्यासाठी अभ्युदय फाउंडेशन या सेवाभावी संस्थेने पुढाकार घेतला आहे. ही सेवा पातूरकरांसाठी मोफत देण्यात येणार आहे.
अंत्यविधी नंतर अस्थी विसर्जन करण्यासाठी बरेच आप्तेस्टाना दशक्रिया विधीपर्यंत अस्थी कलश ठेवण्यासाठी अडचण निर्माण होत होती. ही अडचण लक्षात घेता अस्थी कलश ठेवण्याची सुरक्षित व्यवस्था स्मशानभूमी मध्ये करण्याबाबतची संकल्पना अभ्युदय फाउंडेशन या संस्थेने मांडली. यासाठी करण्यात आलेल्या आवाहनाला युवा उद्योजक बबलू बयस, पप्पू पैठणकर, सतीश कवले व मित्रपरिवार यांनी प्रतिसाद दिला. यांच्या पुढाकारातून अस्थी कलश लॉकर अभ्युदय फाउंडेशन या सेवाभावी संस्थेला समर्पित करण्यात आले.
या लॉकर चा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला यावेळी अभ्युदय फाउंडेशनचे अध्यक्ष गोपाल गाडगे, सचिव बंटी गहिलोत, डॉ संजयसिंह परिहार, प्रवीण निलखन, प्रशांत बंड, दिलीप निमकंडे आदी सभासद प्रामुख्याने उपस्थित होते.
या ठिकाणी अस्थी कलश ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती साठी किंवा या सेवेचा लाभ घेण्यासाठी अभ्युदय फाउंडेशन या सेवाभावी संस्थेच्या पदाधिकारी यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.